बॉलिवूडचा बाजीराव रणवीर सिंहचा (Ranveer Singh Birthday ) आज (6 जुलै) वाढदिवस आहे. रणवीर सिंह आज 40 वर्षांचा झाला आहे. रणवीर सिंहने 2010 साली'बँड बाजा बारात' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. रणवीरने आपल्या हटके स्टाइलने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. तो कायम आपल्या हटके फॅशनमुळे चर्चेत असतो. मात्र आता रणवीर सिंह एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. रणवीरने वाढदिवसा आधी केलेल्या एका कृतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
रणवीर सिंहने इन्स्टाग्रामवर एक शेवटची स्टोरी शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने '12: 12' असे लिहिलं आहे. तसेच क्रॉस्ड स्वॉर्ड्सचा इमोजी देखील दिला आहे. रणवीर सिंहच्या या कृतीमुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहेत. नेटकरी रणवीरच्या अशा कृती मागचे कारण जाणून घेण्यासाठी आतुर आहेत.
सध्या रणवीर सिंह त्याचा आगामी चित्रपट 'धुरंधर'च्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्याचे पाहायला मिळत आहे. चित्रपटात त्याचा हटके अंदाज पाहायला मिळणार आहे. 'धुरंधर' चित्रपटात रणवीरसोबत संजय दत्त, आर. माधवन, अर्जुन रामपाल, अक्षय खन्ना असे अनेक कलाकार पाहायला मिळणार आहेत.
नेटकरी रणवीर सिंहच्या इन्स्टाग्राम पोस्ट डिलिट मागे 'धुरंधर' चित्रपटत असल्याचे बोलत आहे. रणवीर सिंहने 'धुरंधर' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी असे केल्याची चर्चा सोशल मीडियावर केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.