Shreya Maskar
बॉलिवूडचा बाजीराव रणवीर सिंह आज (6 जुलै) 40 वर्षांचा झाला आहे.
रणवीर सिंहने 2010 साली'बँड बाजा बारात' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली.
2015 साली संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'बाजीराव मस्तानी' प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात रणवीरने पेशवा बाजीराव यांची भूमिका साकारली होती.
दीपिका आणि रणवीरचा गाजलेला चित्रपट म्हणजे 2018 साली रिलीज झालेला 'पद्मावत' होय.
2019 साली रिलीज झालेल्या 'गल्ली बॉय' चित्रपटात रणवीरचा हटके अंदाज पाहायला मिळाला.
2013 साली रिलीज झालेल्या 'लुटेरा' चित्रपटात एक सुंदर प्रेमकथा दाखवण्यात आली आहे.
रणवीरच्या '83' प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. हा चित्रपट क्रिकेटवर आधारित आहे.
रणवीर सिंह आणि आलिया भट्टचा 'रॉकी और रानी की प्रेम कहाणी' 2023ला रिलीज झाला. या चित्रपटातील गाणी सोशल मीडियावर आजही धुमाकूळ घालतात.