Arijit Singh Struggle Story Instagram
मनोरंजन बातम्या

Arijit Singh Birthday: बॉलिवूडमधील महागडा गायक; आज आहे कोट्यवधींचा मालक पण जगतो साधं आयुष्य

Arijit Singh News: बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक अरिजित सिंगचा आज वाढदिवस आहे. जाणून घेऊया त्याच्याविषयीच्या खास गोष्टी…

Chetan Bodke

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये असे अनेक आवाज आहेत, जे प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिले आहेत. याच आवाजांपैकी एक आहे गायक अरिजित सिंह (Arijit Singh). त्याने आपल्या आवाजाच्या माध्यमातून चाहत्यांना मंत्रमुग्ध केले आहे. अरिजीतने चाहत्यांना आजवर आपल्या आवाजातून प्रेम आणि दुःख या दोन्ही भावना अतिशय प्रभावीपणे व्यक्त केल्या आहेत. आपल्या गाण्यातून आणि आवाजाच्या माध्यमातून त्याने चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे. आज (25 एप्रिल) अरिजित आपला ३६ वा वाढदिवस साजरा करत आहे. (Bollywood)

अरिजित सिंहचा जन्म २५ एप्रिल १९८७ रोजी पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये झाला आहे. वडील पंजाबी आणि आई बंगाली आहे. अरिजितला कुटुंबाकडून संगीताचा वारसा मिळाला आहे. आई गायिका तर मामा तबलावादक होते. तर त्याच्या आजीलाही भारतीय सांस्कृतिक संगीतात आवड होती. म्हणून त्यानेही संगीत क्षेत्रातच आपलं करियर करण्याचे ठरवले. सोनी टिव्हीवरील ‘फेम गुरुकुल’ या रिॲलिटी शोमधून २००५ मध्ये अरिजितने म्युझिक करियरला सुरुवात केली. मात्र, त्याला तो शो जिंकता आला नाही. (Singer)

त्यानंतर अरिजित ‘१० के १० ले गए दिल’ या रिॲलिटी शोमध्ये सहभाग घेतला होता. पण दुर्दैवानेही या शोचा तो विजेता होऊ शकला नाही. ग्रँड फिनालेवेळी अरिजीतचे प्रतिस्पर्धी दुसऱ्या रिॲलिटी शोचे विजेते होते. २०११ मध्ये रिलीज झालेल्या ‘मर्डर २’ मधील ‘फिर मोहब्बत’ गाण्याच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये गायक म्हणून सुरुवात केली. या गाण्यानेच अरिजीतला खरी ओळख दिली. याआधी अरिजीत सहायक म्युझिक प्रोग्रामर म्हणून शंकर-एहसान-लॉय, विशाल-शेखर आणि मिथुनबरोबर काम करत होता. अरिजीतने ‘केसरिया’, ‘चन्ना मेरेया’, ‘ऐ दिल है मुश्किल’, ‘तुम ही हो’ सह अनेक गाण्यांतून प्रसिद्धी मिळवली. (Bollywood News)

अरिजित सिंहच्या संपत्तीबद्दल बोलायचे तर, एका लाइव्ह कॉन्सर्टसाठी अरिजीत १.५ कोटी रुपये इतके मानधन आकारतो. तर चित्रपटांतील गाणं गाण्यासाठी ८ ते १० लाख रुपये मानधन घेते. अरिजीतची एकूण संपत्ती ५५ कोटी रुपयांच्या आसपास आहे. अरिजित नवी मुंबईत राहतो. त्याच्या घराची किंमत सुमारे ८ कोटी रुपये आहे. त्याच्याकडे हमर, रेंज रोव्हर, मर्सिडीज-बेंझ सारख्या लक्झरीयस कार्सचाही समावेश आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांची टीका

Baba Vanga: बाबा वेंगांचं 2026 संदर्भातलं मोठं भाकीत चर्चेत, माणसं आणि एलियन भेटण्याचा केला दावा

Actress MMS Leak: प्रसिद्ध अभिनेत्रीचा MMS झाला लीक, व्हायरल व्हिडिओमागील सत्य वाचून धक्का बसेल

Shraddha Kapoor : बँड बाजा बारात! यंदा श्रद्धा कपूर लग्न करणार? 'त्या' एका कमेंटने चाहत्यांमध्ये चर्चा

Sankranti Special Food : मकर संक्रांतीसाठी बनवा पारंपरिक आणि स्वादिष्ट महाराष्ट्रीयन मेजवानी, पाहा पदार्थांची यादी

SCROLL FOR NEXT