Kush Sinha On Sonakshi- Zaheer Wedding Saam TV
मनोरंजन बातम्या

Kush Sinha On Sonakshi Wedding: "मी लग्नाला होतो, अफवा पसरवू नका"; सोनाक्षीच्या लग्नात गैरहजर असल्याच्या चर्चांवर कुश सिन्हाची प्रतिक्रिया

Sonakshi Sinha's Brother Kush Sinha on Her Wedding: लव सिन्हा आणि कुश सिन्हा हे दोघे सोनाक्षीच्या आंतरधर्मीय लग्न करण्याच्या निर्णयावर नाराज होते. या नाराजीच्या चर्चेदरम्यान बहिणीच्या लग्नाबद्दल कुश सिन्हाने प्रतिक्रिया दिलेली आहे.

Chetan Bodke

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. सोनाक्षी आणि झहीरने रविवारी रजिस्टर मॅरेज करत लग्नगाठ बांधली. त्यानंतर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींसाठी रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दोघांच्याही आई- वडिलांनी उपस्थिती दर्शवली.

लेकीच्या लग्नात शत्रुघ्न सिन्हा आणि पूनम सिन्हा हे मोठ्या आनंदात दिसत होते. पण सध्या सोनाक्षीच्या भावांची चर्चा रंगली आहे. लव सिन्हा व कुश सिन्हा हे दोघे सोनाक्षीच्या आंतरधर्मीय लग्न करण्याच्या निर्णयावर नाराज होते आणि त्यामुळे त्यांनी लग्नाला हजेरी लावली नाही. नुकतेच या नाराजीच्या चर्चेदरम्यान बहिणीच्या लग्नाबद्दल कुश सिन्हाने प्रतिक्रिया दिलेली आहे.

कुश सिन्हाने नुकतीच 'न्यूज १८'ला मुलाखत दिली. त्याने सांगितले की, “कृपया माध्यमांनी खोट्या अफवा पसरवणे थांबवायला हवं. खरंतर मला प्रसिद्धीमध्ये राहायला आवडत नाही. त्यामुळे मी कॅमेऱ्यासमोर आलो नाही. कोणत्याही फोटोमध्ये मी दिसलो नाही म्हणजे मी लग्नाला किंवा रिसेप्शनला अनुपस्थित होतो, असा त्याचा अर्थ होत नाही. मी तिच्या लग्नाला होतो. कायमच भाऊ म्हणून माझा आशीर्वाद आणि शुभेच्छा तिच्या पाठीशी आहे. हा काळ आमच्यासाठी खूप भावनिक होता. ” अशी प्रतिक्रिया कुश सिन्हाने मुलाखतीत दिली.

हिंदुस्तान टाईम्ससोबत बोलताना लव सिन्हाने सांगितलं की, "मला थोडासा वेळ द्या. एक-दोन दिवसात मी लग्नाला का नव्हतो आलो ? याचं स्पष्टीकरण देईल. सध्या मी यावर काहीही बोलू इच्छित नाही." सोनाक्षी- झहीरचं लग्न ठरल्यापासून लव आणि कुशने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नव्हती. सोनाक्षी सिन्हाच्या लग्नात लव सिन्हा आणि कुश सिन्हा दोघेही हजर नव्हते. त्यामुळे सोनाक्षीची बेस्ट फ्रेंड हुमा कुरैशीचा भाऊ साकिब सलीमने सोनाक्षीच्या भावाची भूमिका साकारली होती. सोनाक्षी-जहीरच्या लग्नाचा एक व्हिडिओ समोल आला असून यात साकिब लग्नातील प्रथा पार पाडताना दिसत आहे. याशिवाय सोनाक्षीचे मित्रही यात सहभागी झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बीएमसीतही लाडक्याच किंगमेकर ठरणार? लाडकीच्या हाती, पालिकेची चावी?

ऐन निवडणुकीत राज्यात पैशांचा पाऊस; निवडणूक अधिकाऱ्यांनी २ दिवसांत ९०००००० रुपयांची रोकड पकडली

होय मी बाजीरावच, फडणवीसांची टीका, दादांचं प्रत्युत्तर

Maharashtra Live News Update: जास्तीत जास्त मतदान करावं; एकनाथ शिंदेंचं मतदारांना आवाहन

आई-वडिलांची उपेक्षा करणाऱ्यांनो सावधान! आई-वडिलांकडे पाठ, पगारात कपात

SCROLL FOR NEXT