Vidya Balan Video : विद्या बालनचा आळस 'अतिशय युनिक अतिशय वेगळा'; रॅप साँगवर भन्नाट रील, VIDEO बघा!

Vidya Balan Atishay Unique Atishay Vegla Video : सध्या इन्स्टाग्रामवर अभिनेत्री विद्या बालनचा 'अतिशय युनिक अतिशय वेगळा' या रॅपवरील रील तुफान व्हायरल होत आहे.
Vidya Balan Video : विद्या बालनचा आळस 'अतिशय युनिक अतिशय वेगळा'; रॅप साँगवर भन्नाट रील, VIDEO बघा!
Vidya Balan Atishay Unique Atishay Vegla VideoSaam Tv

सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळ्या रिल्स व्हायरल होत असतात. सध्या इन्स्टाग्रामवर भाडिपा फेम अलोक राजवाडे याच्या 'अतिशय युनिक अतिशय वेगळा' या रॅपचा रिल तुफान व्हायरल होत आहे. या गाण्याची भुरळ लहाण्यांपासून मोठ्यापर्यंत अगदी सर्वांनाच पडली आहे. यामध्ये अनेक मराठी आणि बॉलिवूड सेलिब्रिटींचाही समावेश आहे. अशातच सध्या इन्स्टाग्रामवर अभिनेत्री विद्या बालनचा या गाण्यावरील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Vidya Balan Video : विद्या बालनचा आळस 'अतिशय युनिक अतिशय वेगळा'; रॅप साँगवर भन्नाट रील, VIDEO बघा!
Anant- Radhika Wedding Invite : अनंत- राधिकाची लग्नपत्रिका पाहिलीत का ?, अंबानी कुटुंबीयांकडून पाहुण्यांना खास गिफ्ट्स

विद्या बालनने हा व्हिडिओ दोन दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर शेअर केलेला आहे. "आळस मला आलेला आहे, मी हे इन्स्पिरेशन अलोक राजवाडे आणि भाडिपाकडून घेतलंय" असं कॅप्शन तिने रिल शेअर करत दिलेलं आहे. अगदी अस्खलित चालींवर तिने भारी व्हिडिओ बनवला आहे. सध्या विद्याच्या ह्या रिलचे चाहत्यांकडून कौतुक केले जात आहे. अनेक सेलिब्रिटींनी या व्हिडिओवर रिल बनवलेला आहे.

भाडिपा, अलोक राजवाडे, अमृता सुभाष, सारंग साठ्येसह अनेक सेलिब्रिटींनी विद्या बालनच्या व्हिडिओवर कमेंट्स केलं आहे. विद्याने मराठीमध्ये व्हिडिओ बनवल्यामुळे अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे. विद्याने पहिल्यांदाच मराठी रिल बनवलेला नाही, तिने यापूर्वीही अनेकदा मराठी गाण्यांवर, डायलॉग्जवर व्हिडिओ बनवल्या आहेत.

२ मिलियनहून अधिक चाहत्यांनी विद्या बालनचा हा व्हिडीओ चाहत्यांनी पाहिला असून १ लाख ४० हजारांहून अधिक युजर्सने व्हिडिओला लाईक केले आहे. 'दो और दो प्यार' या चित्रपटामध्ये शेवटची विद्या बालन दिसली होती. विद्या बालन आता कोणत्या नव्या चित्रपटामध्ये दिसणार याकरिता चाहते उत्सुक आहेत. विद्या नेहमीच इन्स्टाग्रामवर सक्रिय असते.

Vidya Balan Video : विद्या बालनचा आळस 'अतिशय युनिक अतिशय वेगळा'; रॅप साँगवर भन्नाट रील, VIDEO बघा!
Kalki 2898 AD Twitter Review : प्रभासची तुफान क्रेझ; 'कल्की 2898 एडी'चा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी चाहत्यांनी भल्या पहाटेच लावली रांग

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com