Siddhi Hande
कोकणातील लोकप्रिय पदार्थांमध्ये आंबोळी खूप स्पेशल आहे. कोकणातील प्रत्येक घरात आंबोळी बनवली जाते.
आंबोळी चहासोबत, भाजीसोबत किंवा उसळीसोबत खाऊ शकता. नाश्त्याला हा पदार्थ जास्त बनवला जातो.
तांदूळ, उडीद डाळ,पोहे, मेथीचे दाणे, मीठ, तेल किंवा तूप
सर्वात आधी तुम्हाला तांदूळ, उडीद डाळ आणि मेथीचे दाणे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. ६-७ तास पाण्यात भिजत ठेवा. यानंतर पोहे फक्त १५ मिनिटासाठी भिजत ठेवा.
यानंतर भिजवलेले तांदूळ, डाळ आणि पोहे मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. हे पीठ जास्त घट्ट आणि बारीक नसावे. पीठाची मध्यम पेस्ट असावी.
यानंतर तुम्हाला वाटलेले पीठ ७ तास उबदार ठिकाणी ठेवायचे आहे. हे पीठ छान फुगले पाहिजे.
यानंतर पीठात चवीनुसार मीठ टाका. पीठ छान मिक्स करा.
यानंतर बिडाच्या तव्याला तेल लावा. त्यावर पीठ पसरवून घ्या.
या आंबोळीच्या बाजूने तेल सोडा. त्यावर झाकण ठेवून ३-४ मिनिटे वाफवून घ्या. आंबोळी फक्त एका बाजूने भाजायची असते.