Amitabh Bachchan Jaya Bachchan Marriage Saam Tv
मनोरंजन बातम्या

Jaya Bachchan Birthday: लंडनला जाण्यासाठी बिग बींनी मान्य केली वडिलांची अट; नंतर २४ तासांत जया बच्चन यांच्याशी लग्न, जाणून घ्या हटके लव्हस्टोरी

Jaya Bachchan: जया बच्चन आपल्या चाहत्यांमध्ये अभिनयासाठी, राजकीय प्रवासासाठी आणि समाजसेवेसाठी विशेष ओळखल्या जातात. जया यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्यांच्या कारकिर्दी संबंधित काही खास गोष्टी...

Chetan Bodke

Amitabh Bachchan Jaya Bachchan Marriage

ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन आज ९ एप्रिल रोजी आपला ७६ वा वाढदिवस साजरा करत आहेत. जया बच्चन आपल्या चाहत्यांमध्ये अभिनयासाठी, राजकीय प्रवासासाठी आणि समाजसेवेसाठी विशेष ओळखल्या जातात. जया यांनी आपल्या सिनेकारकिर्दीत अनेक उत्कृष्ट चित्रपट दिले आहेत. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्यांच्या कारकिर्दी संबंधित काही खास गोष्टी...

जया भादुरी यांचा जन्म ९ एप्रिल १९४८ रोजी झाला. जया भादुरी यांनी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII), पुणे येथून ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आहे. जया यांना बालपणापासूनच फिल्म इंडस्ट्रीमध्ये जाण्याची आवड होती, म्हणून त्यांनी फिल्म अँड टेलिव्हिजनचा अभ्यास केला होता. जया भादुरी यांनी सत्यजित रे यांच्या १९६३ मध्ये रिलीज झालेल्या ‘महानगर’ या बंगाली चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यावेळी त्या १५ वर्षांच्या होत्या.

ऋषिकेश मुखर्जींनी जया यांना १९७१ मध्ये रिलीज झालेल्या ‘गुड्डी’ चित्रपटातून प्रमुख भूमिकेत काम करण्याची संधी दिली होती. त्या चित्रपटातून जया यांच्या अभिनयाचे चाहत्यांमध्ये कौतुक झाले. यानंतर त्यांनी बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट दिले. यानंतर जया बच्चन त्यांनी 'अभिमान', 'मिली', 'चुपके-चुपके', 'शोले' सारख्या चित्रपटांत एकत्र काम केले. १९८१ मध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘सिलसिला’ चित्रपटात काम केल्यानंतर जया यांनी काही वर्ष सिनेसृष्टीत ब्रेक घेतला. २००० नंतर जया बच्चन यांनी काही मोजक्याच चित्रपटांत काम केले.

‘जंजीर’ चित्रपटासाठी अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्यासाठी अनेक बड्या अभिनेत्रींनी नकार दिला होता. त्यावेळी जया यांनी त्यांच्यासोबत काम करण्यासाठी होकार दिला होता. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांचीही मैत्री झाली. त्यांचा पहिला चित्रपट ‘जंजीर’ बॉक्स ऑफिसवर प्रचंड गाजला. या चित्रपटानंतर दोघांचीही वारंवार भेटी होत होती. अमिताभ बच्चन यांचे वडील हरिवंशराय बच्चन आणि आई तेजी बच्चन यांनी जया यांना पसंत केले होते.

बॅक टू बॅक फ्लॉप चित्रपट झाल्यामुळे अमिताभ यांनी आपल्या मित्रांना वचन दिले की, जर हा चित्रपट हिट झाला, तर मी लंडनला फिरायला जाईल. ‘जंजीर’ चित्रपट सुपरहिट ठरल्यानंतर अमिताभ त्यांच्या वडिलांकडे लंडनला जाण्यासाठी परमिशन मागण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्यांच्या वडिलांनी, ‘जर तुझ्यासोबत जया येत असेल तर, तुम्ही लग्न करूनच घ्या. आणि मग तुम्ही तिकडे जा. जर लग्न करायचे नसेल लंडनला जाऊ नको.’ अमिताभ यांना त्यांच्या वडिलांनी अशी अट घातली होती. आई-वडिलांच्या आग्रहाखातर अमिताभ यांना ते मान्य करावे लागले. त्यानंतर दोघांनीही ३ जून १९७३ रोजी लग्न केले आणि लंडनला गेले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: साकोलीचं महाभारत ! जातीय समीकरण कुणाच्या पथ्यावर? पटोलेंपुढे अविनाश ब्राह्मणकरांचं आव्हान

Horoscope Today : काहींना नको असलेल्या गोष्टींचा होईल त्रास, तर कोणाचे शत्रू काढतील डोके वर, वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

Horoscope: कुंभ राशीचं करिअर, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने कसा असेल आजचा दिवस; वाचा आजचे राशीभविष्य

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

SCROLL FOR NEXT