Kareena Kapoor And Akshay Kumar News Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kareena Kapoor And Akshay Kumar : करीना कपूर अक्षय कुमारवर बऱ्याचवेळा थुंकली! असं काय घडलं? अभिनेत्यानं स्वतःच केला खुलासा

Kareena Kapoor And Akshay Kumar News : अक्षय कुमार आणि करीना कपूर यांनी फार कमी सिनेमात एकत्र काम केलं आहे. पण जेवढे सिनेमे केले, त्यात या दोघांची केमिस्ट्री लोकांना प्रचंड भावली.

Mohini Sonar

अक्षय कुमार आणि करीना कपूर यांनी फार कमी सिनेमात एकत्र काम केलं आहे. पण जेवढे सिनेमे केले, त्यात या दोघांची केमिस्ट्री लोकांना प्रचंड भावली. पण सध्या अक्षय कुमारनं करीनाबाबतचा एक किस्सा सांगितला आहे. त्यामुळे त्याच्या विधानाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरु झाली आहे.

'गुड न्यूज' चित्रपटावेळचा हा किस्सा आहे. ज्यात अक्षय कुमारने करीनाचा एक प्रसंग सांगितला आहे. 'गुड न्यूज' चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत अक्षय कुमार, करीना कपूर, कियारा अडवाणी आणि दलजीत दोसांझ आहेत. या चित्रपटाची एक वेगळी कॉन्सेप्ट होती. पण बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फार काही कमाई करु शकला नाही. पण आता अक्षय कुमारच्या मुलाखतीचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतो आहे. ज्यात अक्षय कुमारने करीनाच्या काही विचित्र सवयींबाबत खुलासा केला आहे.

अक्षयनं सांगितला 'तो' किस्सा

एका मुलाखतीत त्याला प्रश्न विचारला असता, त्यांनं जे काही सांगितलं ते ऐकून तुम्ही थक्क व्हाल. फेमस असलेल्या 'द कपिल शर्मा शो'मध्ये अक्षय कुमार प्रमोशनसाठी गेला होता. तिथे कपिलने त्याला विचारलं की, आम्ही ऐकलं एका सीनमुळे तुम्हाला वारंवार मेकअप दुरुस्त करावा लागला होता.

त्यावर उत्तर देताना, अक्षयनं सांगितलं, "हो, 'गुड न्यूज'चं शुटींग सुरु असताना एका सीनमध्ये करिना अतिशय जोरात बोलत होती. आणि ती माझ्यावर ओरडून बोलत असतानाचा तो सीन होता, त्यामुळे ती एवढ्यावेळा माझ्या तोंडावर थुंकली की, मला सारखं सारखं मेकअप दुरुस्त करावा लागला. डिलिव्हरीच्या वेळीचा तो सीन होता. आणि यावेळी ती ओरडताना माझ्यावर थुंकतेय हे तिला कळतच नव्हतं. त्यामुळे अशी वेळ ती माझ्यावर आली होती." असं अक्षय कुमारनं सांगितलं आहे.

करीनाला आहे आणखी एक वाईट सवय

एवढंच नाही तर करीनाला तिचे नखं खाण्याचीही वाईट सवय असल्याचं सांगितलं जातं. करीनाने स्वतःच याबाबत खुलासा केला आहे. ती म्हणाली, "मी नखं खाऊ नये, यासाठी माझी आई माझ्या नखांना मिरची पावडर लावायची तरीही, माझी सवय काही गेली नाही."

दरम्यान, अक्षय कुमार आणि करीना कपूरच्या या किस्स्याला सोशल मिडियावर नेटकऱ्यांनी दिलखुलास प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. त्यामुळे त्यांचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. अक्षय कुमार आणि करिना कपूरने आधई ऐतराज या सिनेमातही काम केलं आहे. आणि चित्रपट सुपरहिट ठरला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: शाळा आहे की मसाज पार्लर! शिक्षकाने विद्यार्थिनींकडून करून घेतली बॉडी मसाज, VIDEO पाहून तुम्हालाही येईल राग

Aayush Komkar: शेवटी सूड घेतलाच! वनराजच्या अंत्यविधीला शस्त्रपूजन करत बदला घेण्याची शपथ, अन् १ वर्षाने आयुष कोमकरची हत्या

Shocking : संतापजनक! मुलाच्या हव्यासापोटी जन्मदात्याने मुलीला संपवलं; बिहार हादरलं

चांदीच्या पालखीतून निघाला पुण्याचा पहिला मानाचा कसबा गणपती|VIDEO

'...नाहीतर तुझे डोळे बाहेर काढेन' प्रसिद्ध कंटेट क्रिएटरच्या ब्लाऊजकडे पाहत राहिला, बस प्रवासात आजोबाचा प्रताप

SCROLL FOR NEXT