बॉलिवूड इंडस्ट्रीतून दु:खद बातमी समोर येत आहे. हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध चित्रपट निर्माते सतराम रोहरा यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ८५व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. सतराम रोहरा यांची विशेष ओळख 'जय संतोषी माँ' या चित्रपटातून झालेली आहे. 'जय संतोषी माँ' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरील ब्लॉकबस्टर चित्रपट होता. या चित्रपटाने १९७५ ला रिलीज झालेल्या ह्या चित्रपटाने 'शोले' चित्रपटालाही टक्कर दिली. सतराम यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
सतराम यांच्या निधनाचे वृत्त पाहून फॅन्ससह बॉलिवूडमधील अनेक दिग्गज सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सतराम यांना श्रद्धांजली वाहिली आहे. सतराम रोहरा यांचा जन्म १६ जून १९३९ रोजी सिंध प्रांतात (आताचं पाकिस्तान) झाला आहे.
भारताच्या फाळणीनंतर सतराम आपल्या कुटुंबासोबत मुंबईमध्ये शिफ्ट झाले. सतराम यांनी आपले उर्वरित शिक्षण मुंबईतूनच पूर्ण केले. सतराम रोहरा यांचा निर्माते म्हणून पहिला चित्रपट १९६६ मध्ये रिलीज झालेला 'शेरा डाकू' हा चित्रपट होता. त्यांचे 'रॉकी मेरा नाम'पासून अनेक चित्रपट हिट ठरले होते.
सतराम रोहरा यांनी जितेंद्र कुमार, हेमा मालिनी सारख्या अनेक ब्लॉकबस्टर कलाकारांसोबत काम केले आहे. १५ ऑगस्ट १९७५ ला 'जय संतोषी माँ' आणि 'शोले' हे दोन्हीही चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज झाले होते. 'जय संतोषी माँ' चित्रपटाने अनेक विक्रम आपल्या नावावर केले. त्या चित्रपटाचा विक्रम मोडणे कोणत्याच चित्रपटाला शक्य झालेले नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.