Kangana Ranaut Birthday Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kangana Ranaut Birthday: एका 'स्विच ऑफ फोन'मुळे कंगनाचं नशीबच पालटलं, कशी झाली 'बॉलिवूडची क्वीन'

Kangana Ranaut News: बॉलिवूडची ‘पंगा गर्ल’ कंगना रणौत म्हटलं की वाद आलाच. आज या ‘पंगा गर्ल’ चा ३७ वा वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त तिचा यशस्वी अभिनेत्री होण्यापर्यंतच्या प्रवासावर प्रकाशझोत टाकूया...

Chetan Bodke

Kangana Ranaut Birthday

बॉलिवूडची पंगा गर्ल कंगना रणौत म्हटलं की वाद आलाच. आज या पंगा गर्लचा ३७ वा वाढदिवस आहे. अभिनेत्री, निर्माती आणि दिग्दर्शिका म्हणून कंगना आपली भूमिका लिलया पार पाडताना दिसत आहे. कायमच आपल्या वादग्रस्त चर्चेत राहणाऱ्या कंगनाचा एक प्रसिद्ध अभिनेत्री होण्या करिताचा प्रवास इतका काही सोपा नव्हता. कंगनाने तिच्या आजवरच्या अभिनयामुळे चाहत्यांच्या मनामनात घर केलं आहे. 'फॅशन' असो, 'क्विन' असो की, 'तनु वेड्स मनू' कंगनाने नेहमीच तिच्या भारदस्त अभिनयाने सिनेमे गाजवले आहेत. आज तिच्या वाढदिवसानिमित्त आपण तिचा यशस्वी अभिनेत्री होण्यापर्यंतच्या प्रवासावर प्रकाशझोत टाकूया... (Bollywood)

कंगना रनौतचा जन्म २३ मार्च १९८७ रोजी हिमाचल प्रदेशातील भंबाला येथे झाला आहे. मंडी जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातून आलेल्या कंगनाचे वडील व्यवासायिक आणि आई शिक्षिका आहे. कंगनाने डॉक्टर व्हावं, अशी तिच्या आई- वडीलांची इच्छा होती. पण असं असलं तरी कंगनाला शिक्षणात रस नव्हता. इतकंच नव्हे तर बारावीच्या परीक्षेत कंगना नापास झाली होती. तिला बालपणापासूनच अभिनयाची आवड होती. तिला अभिनेत्री व्हायचं होतं. कंगनाला कळत होतं की, अभिनेत्री होण्यासाठी आपल्याला घरातून म्हणावा तसा पाठिंबा मिळत नाहीये. तिचा निर्णय घरातले सदस्य ही मान्य करत नव्हते. त्यामुळे अभिनेत्री होण्यासाठी वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी कंगनाने घर सोडले आणि मुंबई गाठले. (Bollywood Actress)

सुरुवातीच्या काळामध्ये, कंगनाने काही दिवस मॉडेलिंगच्या प्रोजेक्टमध्ये काम केले आणि नंतर तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केले. तिची बॉलिवूडमध्ये कोणतीही ओळख नसल्याने कंगनाला चित्रपट मिळणे सोपे नव्हते. यासाठी तिला खूप मेहनत करावी लागली. कंगना राणौतला वयाच्या १७ व्या वर्षी पहिला चित्रपट मिळाला. 'आय लव्ह यू बॉस' असं तिच्या पहिल्या चित्रपटाचं नाव. हा चित्रपट पहलाज निलानी दिग्दर्शित करत होते. कंगनाला हा चित्रपट २००४ साली मिळाला होता. पण तिने ह्या चित्रपटामध्ये काम केले नाही. काही कारणास्तव चित्रपट अर्धवट सोडून कंगनाने महेश भट्ट यांच्या 'गँगस्टर'साठी काम करायला सुरुवात केली. मग तिच्या सिनेकरियरमधील 'गँगस्टर' हा चित्रपट पहिला चित्रपट ठरला. कंगनाचा 'गँगस्टर' हा चित्रपट २००६ मध्ये रिलीज झाला होता. (Kangana Ranaut)

कंगनाचं वय कमी असल्यामुळे तिला हा चित्रपट नाकारण्यात आला होता. अनेक महिन्यानंतर पुन्हा एकदा तिला त्या चित्रपटाची ऑफर मिळाली होती. 'गँगस्टर' चित्रपटाच्या कास्टिंगचा अनुभव दिग्दर्शक अनुराग बसुने सांगितला होता," चित्रगंदाने चित्रपटातून माघार घेतल्यानंतर अनुराग बसूने लगेचच कंगनाला आपल्या चित्रपटात कास्ट केले होते. खरंतर, चित्रांगदाचा फोन स्विच ऑफ लागल्यामुळे अनुरागने शेवटच्या क्षणी 'गँगस्टर' चित्रपटात धाकड गर्लला कास्ट केले." अनुराग बसूने कंगनाला एका आठवड्याचा वेळ दिला होता. कंगनाला जर आठवड्याभरात तिचा पासपोर्ट मिळाला तरच तिला तो चित्रपट मिळणार होता. अखेर तिला पासपोर्ट मिळाला आणि तिच्या फिल्मी करियरमधील 'गँगस्टर' चित्रपट हा पहिला चित्रपट ठरला. (Bollywood Film)

'गँगस्टर'ने कंगना रनौतला इंडस्ट्रीत ओळख दिली. यानंतर कगंनाने 'वो लम्हे', 'लाइफ इन अ मेट्रो', 'वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई', 'राझ', 'टिकू वेड्स तनु', 'क्रिश', 'क्वीन' आणि 'मणिकर्णिका' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिला चार वेळा राष्ट्रीय पुरस्काराने, पाच वेळा फिल्मफेअर पुरस्काराने तर तीन वेळा इंटरनॅशनल फिल्म अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandurbar News : धक्कादायक.. गर्भवती महिलेचा रस्त्यातच गर्भपात; रस्ता नसल्याने बांबुची झोळीतून जीवघेणा प्रवास

महायुतीने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं, एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

Voter ID: दोन मतदार ओळखपत्र आहेत? होऊ शकते जेल; कारण काय? जाणून घ्या

Gold Rate Today : सोनं झालं स्वस्त! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात घसरण, पाहा सोन्याचा आजचा भाव

School Holiday: मतदान केंद्र असलेल्या पालिकेच्या शाळांना उद्या सुट्टी, तर शिक्षण आयुक्त म्हणतात उद्या शाळा सुरु राहणार

SCROLL FOR NEXT