IPL 2024 Opening Ceremony: आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्यात बॉलिवूड सेलिब्रिटी दाखवणार जलवा, अक्षय कुमारसह 'हे' कलाकार होणार सहभागी

Bollywood Celebrity: यंदाच्या आयपीएल 2024चा उद्घाटन सोहळा आज होणार आहे. या सोहळ्यामध्ये बॉलिवूड (Bollywood) आणि टीव्ही स्टार्स आपली जादू कायम दाखवत असतात. आयपीएलच्या रंगतदार सुरुवातीसाठी आयोजकांनी धमाकेदार तयारी केली आहे.
IPL 2024 Opening Ceremony
IPL 2024 Opening CeremonySaam Tv
Published On

IPL 2024:

आयपीएलच्या 17 व्या (IPL 2024) सीझनची क्रिकेटप्रेमी आतुरतेने वाट पाहत आहे. त्यांची प्रतीक्षा आज संपणार आहे. या सीझनला आजपासून सुरू होणार असून आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. आयपीएल 2024 या स्पर्धेची सुरूवात चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यातील सामन्याने होणार आहे. रोमांचक सामन्यांव्यतिरिक्त आयपीएलचा उद्घाटन सोहळा देखील दणक्यामध्ये पार पडत असतो.

यंदाच्या आयपीएल 2024चा उद्घाटन सोहळा आज होणार आहे. या सोहळ्यामध्ये बॉलिवूड (Bollywood) आणि टीव्ही स्टार्स आपली जादू कायम दाखवत असतात. आयपीएलच्या रंगतदार सुरुवातीसाठी आयोजकांनी धमाकेदार तयारी केली आहे. या सोहळ्यामध्ये कोण-कोण सेलिब्रिटी सहभागी होणार आहे ते आपण पाहणार आहोत...

आयपीएल 2024 चा पहिला सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर होणार आहे. हा सामना रात्री 8 वाजता सुरू होणार आहे. सहसा आयपीएल सामने संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होतात. पण यंदा उद्घाटन समारंभ सामन्यापूर्वी आयोजित केला जाईल. ज्यामुळे आरसीबी आणि सीएसके यांच्यातील सामना अर्ध्या तासाच्या विलंबाने म्हणजेच रात्री 8 वाजता सुरू होईल. या सामन्याचा नाणेफेक संध्याकाळी 7.30 वाजता होणार आहे. या सोहळ्यामध्ये बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यासारखे बॉलिवूड कलाकार दिसणार आहेत.

आयपीएलच्या 17व्या हंगामाची सुरुवात चांगली होणार आहे. यासाठी आयोजकांनी बरीच तयारी केली असून त्यात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आणि गायक आपल्या परफॉर्मन्सने उपस्थित प्रेक्षकांना आणि खेळाडूंना मंत्रमुग्ध करणार आहेत. सामन्यापूर्वीचा हा रंगतदार कार्यक्रम सायंकाळी 6.30 वाजता सुरू होणार असून जवळपास अर्धा तास चालणार आहे. त्यामुळे आजचा सामना पाहण्यासाठी येणाऱ्या क्रिकेटप्रेमींचे चांगलेच मनोरंजन होणार आहे.

अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ व्यतिरिक्त प्रसिद्ध गायक ए. आर रहमान आणि सोनू निगम हे देखील उद्घाटन सोहळ्यात परफॉर्म करणार आहेत. देशभक्तीपर गाण्यांव्यतिरिक्त एआर रहमान आणि सोनू निगम बॉलिवूड गाण्यांनी या सामन्या दरम्यान वातावरण मनोरंजक करतील. तर अक्षय आणि टायगर ही 'बडे मियाँ-छोटे मियाँ'ची जोडीही आपली जादू दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत. मागच्या वर्षी रश्मिका मंदान्ना, तमन्ना भाटिया आणि अरिजित सिंग यांनी आयपीएलच्या उद्घाटन समारंभात जबरदस्त परफॉर्मन्स दिले होते.

IPL 2024 Opening Ceremony
Priyanka Chopra: मायदेशी येताच प्रियंका चोप्राच्या हाती लागला बिग बजेट चित्रपट, संजय लीला भन्साळींसोबत करणार काम

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com