Aditi Rao Hydari canva
मनोरंजन बातम्या

Aditi Rao Hydari: अदिती राव हैदरी लग्नबंधनात अडकली; अभिनेत्यासोबत थाटला संसार, फोटो व्हायरल!

Aditi Rao Hydari Marraige Post: बॉलिवूड अभिनेत्री अदिती राव हैदरी अडकली लग्नबंधनात. सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना दिली आनंदाची बातमी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बॉलिवूड अभिनेत्री अदिती राव हैदरी काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे. 'हिरामंडी' या चित्रपटामधील गजगामीनी वॉकने चाहत्यांना त्या गाण्याची भूरळ पाडली होती. आताच अभिनेत्री आदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ यांनी लग्नगाठ बाधली आहे. अभिनेत्रीने गुपचुप लग्न करुन तिच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. अभिनेत्रीने तिच्या पतीसह सोशल मीडियावर फोटोज शेअर केले आहेत.

अभिनेत्री अदिती राव हैदरीचा वानपर्थीमधील 400 वर्षे जुन्या मंदिरात विवाह सोहळा पार पडला. काही दिवसांपासून अदितीच्या रिलेशनशिपची चर्चा सुरु होती. मात्र आता तिनं तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

"तू माझा सूर्य आहेस, तू माझा चंद्र आणि तू सगळे तारे आहेस. आता आयुष्यभरासाठी आम्ही एकमेकांचे जोडीदार झालो आहोत आता आयुष्यातील आनंद आणि हसणं कधीच संपणार नाही. ..आमच्यातील प्रेम आणखी बहरेल." असं अभिनेत्रीने तिच्या लग्नाच्या पोस्टला कॅप्शन दिले आहे. पोस्ट केलेल्या फोटोमध्ये अभिनेत्रीने सोनेरी रंगाची साडी नेसली असून तिच्या पती सिद्धार्थने पांढरा कुर्ता आणि लुंगी आसा पोशाख परिधान केला आहे. अभिनेत्राचा विवाह सोहळा खुप साध्या पद्धतीनं पार पडला.

अभिनेत्री अदिती राव हैदरी तिच्या सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. 'हिरामंडी' या चित्रपटामुळे अभिनेत्रीला भरपूर प्रसिद्धी मिळाली होती. अभिनेत्री आता लग्नानंतर बॉलिवूडमघून ब्रेक घेणार का? असा प्रश्न अनेक चाहत्यांनी उपस्थित केला आहे. चाहत्यांनी अदितीला तिच्या नव्या आयुष्यासाठी भरपूर शुभेच्छा दिल्या आहेत. चाहत्यांनी पोस्टवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

Edited By: Nirmiti Rasal.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akot News : पुराचा वेढा; संपर्क तुटला; अमिनापूरमधील शेकडो ग्रामस्थ अडकले

Ind Vs Eng Oval Test : इंग्लंडविरुद्ध पाचव्या कसोटीत टीम इंडियात होणार मोठे बदल, जसप्रीत बुमराह खेळणार?

पहलगाम हल्ल्याचा बदला घेतलाच! ३ दहशतवाद्यांना धाडलं यमसदनी, अमित शहांनी संसदेत काय-काय सांगितलं?

Maharashtra Live News Update : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मनसेची बैठक

Monsoon Sweating : पावसाळ्यात जास्त घाम का येतो? यावर उपाय काय?

SCROLL FOR NEXT