Ruturaj Gaikwad Birthday: ऋतुराजच्या वाढदिवशी पत्नी उत्कर्षाची खास पोस्ट! हटके कॅप्शन देत म्हणाली, 'तो अजूनही..'

Ruturaj Gaikwad Birthday Special: ऋतुराज गायकवाडच्या वाढदिवशी पत्नी उत्कर्षाने खास पोस्ट शेअर केली आहे.
ruturaj gaikwad utkarsha pawar
ruturaj gaikwad utkarsha pawarinstagram

Ruturaj Gaikwad- Utkarsha Pawar:

भारतीय संघाचा स्टार क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाडने गेल्या काही वर्षात दमदार खेळ करुन भारतीय संघात आपलं स्थान निश्चित केलं आहे. मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये ऋतुराज गायकवाडकडे आघाडीचा फलंदाज म्हणून पाहिलं जातं.

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाचं नेतृत्व करताना त्याने भारताला सुवर्णपदक जिंकून दिलं. दरम्यान भारताचा हा स्टार फलंदाज आज (३१ जानेवारी) आपला २७ वा वाढदिवस साजरा करतोय.

पत्नीने शेअर केलेली खास पोस्ट चर्चेत..

ऋतुराजचा वाढदिवस आणखी खास बनवण्यासाठी त्याची पत्नी उत्कर्षा पवारने एक खास पोस्ट शेअर केली आहे. तिने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

ज्यात उत्कर्षा आणि ऋतुराजचे फोटो आणि व्हिडिओ आहेत. या व्हिडिओला हटके कॅप्शन देत तिने,'मैत्री जी कधीच मरत नाही.. अजुनही मनाने लहानच असलेल्या व्यक्तीला माझ्याकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..' असं लिहीलं आहे. (Latest sports updates in marathi)

ruturaj gaikwad utkarsha pawar
IND vs ENG 2nd Test: जडेजा अन् राहुलच्या जागी कोणाला संधी मिळणार? हे आहेत पर्याय

ऋतुराज गायकवाड हा भारतीय संघाचा भविष्यातील स्टार आहे. त्याच्याकडे चेन्नई सुपर किंग्ज संघाचा भविष्यातील कर्णधार म्हणून पाहिलं जात आहे. २०२१ मध्ये झालेल्या आयपीएल स्पर्धेत त्याने दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात ७० धावांची महत्वपूर्ण खेळी केली होती.

त्यानंतर अंतिम सामन्यात फाफ डू प्लेसिससोबत केलेल्या ६१ धावांच्या भागीदारीच्या बळावर चेन्नईने १९२ धावांचा डोंगर उभारला होता. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये महाराष्ट्र संघासाठी दमदार खेळ करुन दाखवला आहे. ऋतुराजचा जन्म ३१ जानेवारी १९९७ रोजी महाराष्ट्रातील पुणे येथे झाला.

ruturaj gaikwad with utkarsha pawar
ruturaj gaikwad with utkarsha pawarinstagram

उत्कर्षासोबत अडकला विवाह बंधनात..

ऋतुराज गायकवाड आणि उत्कर्षा पवार हे दोघेही ३ जून २०२३ रोजी विवाह बंधनात अडकले. त्यांच्या विवाह सोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. उत्कर्षा पवार ही देशांतर्गत क्रिकेटमध्ये महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधीत्व करते.ती देखील पुण्यात राहते. ती अष्टपैलु खेळाडु आहे. दोघांनी एकमेकांना डेट केल्यानंतर विवाह करण्याचा निर्णय घेतला होता.

ruturaj gaikwad utkarsha pawar
IND vs ENG: दुसऱ्या सामन्यातही टीम इंडियाचा पराभव निश्चित? इंग्लंडच्या हेड कोचने सांगितला प्लान

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com