Sushant Singh Rajput Saam tv
मनोरंजन बातम्या

Sushant Singh Rajput: सुशांतच्या घराला अडीच वर्षांपासून भाडेकरु मिळेना, घरमालकाने शेअर केला घराचा VIDEO, भाडंही सांगितलं

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनाला दोन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. पण त्याच्याशी संबंधित गोष्टी आजही कायम चर्चेत आहेत.

Chetan Bodke

Sushant Singh Rajput: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनाला दोन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. पण त्याच्याशी संबंधित गोष्टी आजही कायम चर्चेत आहेत. 14 जून 2020 रोजी, त्याने अचानक त्याच्या मुंबईतील राहत्या घरी आत्महत्या केली. त्याच्या निधनाने बॉलिवूडसह अवघ्या बॉलिवूडसह भारतीय चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली.

सुशांत ज्या घरात आत्महत्या केली, त्या घराला भाडेकरू मिळत नसल्याची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. हे घर गेल्या अडीच वर्षांपासून रिकामेच असून त्यात कोणताही भाडेकरु राहण्यास तयार नसल्याची माहिती मिळत आहे. आता या फ्लॅटच्या एजंटने एक व्हिडिओ ट्वीट करत, दरमाह घराचे भाडे 5 लाख रुपये असल्याचे सांगितले.

रफिक मर्चंट असे या एजंटचे नाव असून तोच या फ्लॅटचा मालक आहे. आता तो हा फ्लॅट कोणत्याही बॉलिवूड सेलिब्रिटीला भाड्याने देऊ इच्छित नाही. तो भाडेकरी म्हणून कॉर्पोरेट व्यक्ती शोधत आहे. त्याने सुशांत सिंह राजपूतच्या रिकाम्या घराचा संपूर्ण व्हिडिओ बनवत ट्विट केला आहे. समुद्रासमोर असलेले 4BHK हे घर आहे. कार्टर रोड, वांद्रे पश्चिम, मुंबई येथे आहे.

मासिक भाडे 5 लाख रुपये आहे. ज्यांना घ्यायचे असेल त्यांच्यासाठी एंजटने नंबरही शेअर केला आहे. सुशांत सिंह राजपूत या घरात मृतावस्थेत आढळला होता. त्याच्या मृत्यूनंतर हे घर असेच रिकामे आहे. त्याच्याकडे साधं कुणी पाहिलंही नाही. असं असलं तरी भाडं एवढं जास्त आहे की सामान्य माणूस एकदाही विचार करू शकत नाही.

रफिक मर्चंट यांनी म्हटलं की, 'लोक या फ्लॅटमध्ये राहायला घाबरतात. या फ्लॅटमध्ये सुशांतचा मृत्यू झाला असं भाडेकरूला कळल्यावर तो एकदाही फ्लॅट पाहायला येत नाही. आजकाल अभिनेत्याच्या मृत्यूची बातमी जुनी झाल्याने लोक निदान फ्लॅट बघायला तरी येत आहेत. मात्र राहायला कोणीही येत नाही. या घराच्या मालकालाही त्याचे भाडे कमी करायचे नाही. त्यामुळे लोक त्याच परिसरात इतर फ्लॅट खरेदी करण्यास प्राधान्य देतात.

'भाडेकरुला अगोदरच सांगितले जातं की, या घरात सुशांत सिंह राजपूत राहत होता, या घरात त्याने गळफास घेतला होता. काहींना इतिहासाची जाणीव नसते तर काहींना त्यांना येथे राहायचे आहे परंतु त्यांचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य त्यांना राहण्यासाठी नकार देतात, असं घर मालकाने सांगितलं.

सुशांत डिसेंबर 2019 पासून सुमारे 4.5 लाख प्रति महिना भाड्याने या घरात राहत होता. तो कोविड-19 लॉकडाऊन दरम्यान त्याच्यासोबत राहणाऱ्या त्याच्या रूममेट्स आणि गर्लफ्रेंड-अभिनेत्री रिया चक्रवर्तीसोबत हे घर शेअर करत होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT