Dilip Kumar: दिलीप कुमारांचा पोस्टर पाहिला अन् कोसळले रडू, सायरा बानोंच्या ह्रदयस्पर्शी व्हिडिओने नेटकरी भावूक

दिलीप कुमार यांचे पोस्टर पाहताच सायरा बानो काही काळ स्तब्ध झाल्या.
Dilip Kumar's 100th Birth Anniversary
Dilip Kumar's 100th Birth AnniversarySaam TV
Published On

Dilip Kumar Birth Anniversary: अभिनेते दिलीप कुमार हे हिंदी सिनेजगतातील ट्रेजिडी किंग म्हणून ओळखले जातात. आपल्या दमदार अभिनयाने आणि आव्हानात्मक भुमिकांनी त्यांनी बॉलिवूडमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. आजही दिलीप कुमार यांच्या कलाकृतींचे सिनेरसिकांमध्ये प्रचंड कौतुक होताना दिसत असते.

आज( ११ डिसेंबर) अभिनेते दिलीप कुमार यांची १०० वी जयंती. याच निमित्ताने पीव्हिआरने देशभरात फिल्म फेस्टिवलचे आयोजन केले होते ज्यामध्ये दिलीप कुमार यांचे चित्रपट दाखवले जाणार आहेत. या फेस्टिवलला दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानो यांनी हजेरी लावली होती. यादरम्यानचा त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये त्या भावूक झालेल्या दिसत आहेत. (Dilip Kumar)

Dilip Kumar's 100th Birth Anniversary
Virat-Anushka: पश्चिमी दिल्लीचा मुलगा-दक्षिण दिल्लीची मुलगी; अनुष्काने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त विराटसाठी केलेली पोस्ट चर्चेत

सायरा बानो आणि दिलीप कुमार यांच्या निखळ प्रेमाची आजही सिने जगतात चर्चा होत असते. दिलीप कुमार हे हिंदी सिने जगतातील लोकप्रिय अभिनेते होते. वयाच्या २५ व्या वर्षी त्यांनी सिने जगतात पाऊल ठेवले होते. आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी बॉलिवूडमध्ये लोकप्रियता मिळवली. ते आज आपल्यात नसले तरी त्यांच्या चित्रपटांची आजही चर्चा होत असते. दिलीप कुमार यांच्या जयंतीनिमित्त फिल्म फेस्टिवलचे आयोजन केले होते ज्यामध्ये त्यांच्या पत्नी सायरा बानो सहभागी झाल्या होत्या. (Film Festival)

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये सायरा बानो दिलीप कुमार यांचा फोटो पाहताच भावूक झालेल्या पाहायला मिळाल्या. दिलीप कुमार यांचे पोस्टर पाहताच सायरा बानो काही काळ स्तब्ध झाल्या, त्यांच्या फोटोवर हात फिरवत स्वतःला सावरताना त्या खूपच भावूक झालेल्या पाहायला मिळाल्या. यावेळी त्यांच्या डोळ्यात अश्रु तरळलेलेही या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहेत.

सायरा बानो यांचा भावूक करणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून त्यांचे चाहतेही भावूक होताना दिसत आहेत. हे खऱ्या प्रेमाच प्रतिक आहे अशा भावना नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत. दरम्यान अभिनेते दिलीप कुमार यांचे ७ जुलै २०२१ रोजी निधन होते. त्याआधी ते अनेक वर्ष अंथरुणावर खिळून होते. या काळात सायरा बानोंनी त्यांची काळजी घेतली. सायरा बानो आणि दिलीप कुमार यांच्या वयात २२ वर्षाचे अंतर होते. मात्र त्यांच्या प्रेमळ नात्यात कधीही अंतर पडले नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com