Virat Anushka Wedding Anniversary: अनुष्काच्या प्रेमात बॉलिवूड सेलिब्रिटीसह हा क्रिकेटवीर, पण लग्न विराटशीच…

विराटच्या आधीही अनुष्का एका बॉलिवूड कलाकाराच्या आणि एका क्रिकेट खेळाडूच्या प्रेमात पडली होती.
Anushka Sharma Virat Kohli wedding anniversary
Anushka Sharma Virat Kohli wedding anniversarySaam TV
Published On

Virat Anushka Wedding Anniversary: अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू विराट कोहली यांची प्रेमकहाणी लग्नाआधी आणि लग्नालनंतर बरीच चर्चेत आहे. या दोघांनीही एकमेकांना ११ डिसेंबर २०१७ ला इचलीमध्ये सात जन्म एकमेकांसोबत राहण्याचे वचन दिले होते.

Anushka Sharma Virat Kohli wedding anniversary
Virat-Anushka: पाच वर्षांपूर्वी विराट-अनुष्काच्या लग्नात झाली होती कोट्यवधींची उधळण; आजही आहे श्रीमंतांच्या यादीत समावेश

बऱ्याचदा अनुष्का विराटची मॅच पाहण्यासाठी पोहोचली होती, तिथे ही ती कॅमेऱ्याच्या गऱ्हाळ्यात दिसली होती. सध्या अनुष्का एका चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यग्र आहे. ती नेहमीच आपल्या शुटिंगमधील काही खास फोटो शेअर करत असते. त्या व्यग्र शुटिंगमधुन सुद्धा अनुष्का चाहत्यांसाठी तिच्या लेकीसोबत आणि विराटसोबतचे काही खास क्षण घालवलेले फोटो शेअर करत असते. अनुष्काच्या चाहत्यांना विराटसोबतच्या अफेअरची चर्चा माहित होती.

तिने बऱ्याचदा सोशल मीडियावरुन त्यांचे काही खास फोटोही शेअर केले होते, पण विराटच्या आधीही अनुष्का एका बॉलिवूड कलाकाराच्या आणि एका क्रिकेट खेळाडूच्या प्रेमात पडली होती. चला तर जाणून घेऊया त्यांच्याविषयी.

Anushka Sharma Virat Kohli wedding anniversary
Virat Anushka Wedding Anniversary: पहिल्याच भेटीत झाले होते कडाक्याचे भांडण; अशी रंगली क्यूट कपल 'विरुष्का'ची फिल्मी लवस्टोरी

अनुष्का बॉलिवूड एन्ट्री आणि प्रेम...

अनुष्काने अनेक चित्रपटातून मुख्य भूमिका साकारत आपले बॉलिवूडमधील स्थान पक्के केले आहे. तिने आपल्या फिल्मी करियरची सुरुवात २००८मध्ये केली. तिचा पहिला चित्रपट शाहरुख मुख्य भूमिकेत असलेला 'रब ने बनादी जोडी'. या चित्रपटाच्या माध्यमातून तिने आपल्या फिल्मी करियरची सुरुवात केली.

त्यानंतर रणवीर कपूरसोबत तिने एक चित्रपट केला होता. २०१० मध्ये अनुष्का आणि रणवीरने 'बँड बाजा बरात' हा चित्रपट केला होता. चित्रपटादरम्यान अनुष्का आणि रणवीरचं सुत जुळल्याची चर्चा होत होती. पण त्यांचे नाते फार काळ टिकले नाही.

Anushka Sharma Virat Kohli wedding anniversary
Armaan Malik : ऐकावं ते नवलचं! लोकप्रिय युट्यूबरच्या दोन्ही पत्नी एकाच वेळी प्रेग्नेंट, नेटकऱ्यांनी दिल्या 'अशा' प्रतिक्रिया

विरुष्काचे प्रेम

बॉलिवूडमध्ये अनुष्काने पदार्पण केल्यानंतर काही वर्ष एका आजारासोबत झुंज देत होती. पण या सगळ्यात 2012 मध्ये सोशल मीडियावर अशी बातमी आली की, अनुष्का क्रिकेटर सुरेश रैनाला डेट करत आहे. दोघांच्या लव्हस्टोरीची बरीच कथा रंगत होती, तरीही त्यांनी त्यांच्या नात्यावर कधीच भाष्य केले नाही. ज्या प्रकारे त्यांचे नाते गुपचूप चालू होते, त्याच पद्धतीने त्यांची प्रेमकहाणीही संपुष्टात आली.

Anushka Sharma Virat Kohli wedding anniversary
Riteish Deshmukh: रितेशचं वेडNess, चाहत्यांच्या गराड्यात घेतला ढोल वाजविण्याचा आनंद

त्यानंतर अनुष्का विराटच्या प्रेमात पडली. त्यांच्या जोडीला सर्वत्र प्रेमही मिळाले. 11 डिसेंबर 2017 रोजी दोघांनी इटलीत मोठ्या थाटामाटात पण मोजक्याच मंडळींमध्ये लग्न उरकले. 11 जानेवारी 2021 रोजी अनुष्काने एका गोंडस मुलीला जन्म दिला, त्यांनी तिचे नाव वामिका असे ठेवले. आज जेव्हा जेव्हा ही जोडी चाहत्यांच्या गऱ्हाळ्यात दिसते तेव्हा ते सर्वांचेच लक्ष आपल्याकडे वेधते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com