
Virat Anushka Wedding Anniversary: विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे जगभरात सेलिब्रेटी कपल म्हणून ओळखले जाते. आपल्या धडाकेबाज फलंदाजीसाठी क्रिकेटविश्वात प्रसिद्ध असलेला विराट आणि अभिनेत्री अनुष्काच्या लवस्टोरीची त्यांच्या चाहत्यांमध्ये नेहमीच चर्चा रंगलेली असते.
विराट अनुष्काच्या प्रेमप्रकरणाची जितकी चर्चा रंगते तितकीच चर्चा त्यांच्या शाही विवाह सोहळ्याची होत असते. विराट आणि अनुष्काचा शाही विवाह सोहळा ११ डिसेंबर २०१७ ला इटलीमध्ये पार पडला होता. आज (११, डिसेबर) विरुष्काच्या लग्नाचा पाचवा वाढदिवस. जाणून घेऊया त्यांच्या फिल्मी लवस्टोरीबद्दलचा रंजक किस्सा.
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या प्रेमप्रकरणाची सुरूवात २०१३ मध्ये झाली होती. त्यांच्या पहिल्या भेटीचा किस्साही खूपच रंजक आहे. विराट आणि अनुष्का एका जाहिरातीच्या शूटिंग दरम्यान पहिल्यांदा भेटले होते. विराटने एका मुलाखतीत बोलताना या भेटीचा किस्सा सांगितला होता.
यावेळी विराटने पहिल्या भेटीवेळी तो खूपच घाबरला होता आणि हीच भिती घालवण्यासाठी त्याने अनुष्काला एक जोकही सांगितला होता. या जाहिरातीच्या शूटिंगवेळी अनुष्का विराटपेक्षा उंच दिसत होती म्हणून विराटने तिला तुम्हाला असं वाटत नाही का की तुम्ही खूप उंच सॅंडल्स घातले आहेत. विराटचा हा टोमणा ऐकून अनुष्का चांगलीच संतापली होती. पण या संवादानंतरच त्यांच्यात चांगली मैत्री झाली.
विराट आणि अनुष्काचा शाही विवाह सोहळा 11 डिसेंबर 2017 रोजी पार पडला. या शाही विवाह सोहळ्याची माध्यमांमध्ये जोरदार चर्चा रंगली होती. एका व्यक्तीच्या येथे आठवडाभर राहण्यासाठी सुमारे एक कोटी रुपये खर्च येतो. यानुसार विराट आणि अनुष्काच्या लग्नासाठी 45-50 कोटी रुपये फक्त पाहुण्यांच्या होस्टिंगवर खर्च करण्यात आले होते.
विरुष्का या नावाने प्रसिद्ध असलेली विराट-अनुष्काची जोडी कमाईच्या बाबतीत खूप पुढे आहे. जीक्यू इंडिया मॅगझिननुसार विराट कोहलीची एकूण संपत्ती 900 कोटी रुपये आहे. तर अनुष्का शर्माची संपत्ती अंदाजे 350 कोटी रुपये आहे. अनुष्काने आतापर्यंत जवळपास 19 चित्रपट केले आहेत. तिचं स्वतःचं प्रोडक्शन हाऊसही आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.