Armaan Malik : ऐकावं ते नवलचं! लोकप्रिय युट्यूबरच्या दोन्ही पत्नी एकाच वेळी प्रेग्नेंट, नेटकऱ्यांनी दिल्या 'अशा' प्रतिक्रिया

अरमानने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन त्याच्या दोन्ही पत्नी प्रेग्नेंट असल्याची माहिती दिली आहे.
Armaan Malik
Armaan MalikSaam Tv
Published On

Armaan Malik: अरमान मलिक हे युट्यूब जगतातील प्रसिद्ध नाव आहे. सोशल मीडिया इंफ्लूंसर आणि कंटेट क्रिएटर म्हणून त्याची मीडिया जगतात ओळख आहे. अरमान मलिक युट्यूब आणि इंस्टाग्रामवर प्रचंड लोकप्रिय आहे. सोशल मीडियावर अरमानचा मोठा चाहतावर्ग आहे. त्याच्या व्हायरल व्हिडिओंची मीडिया जगतात नेहमीच चर्चा रंगलेली असते. मात्र सध्या अरमान वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. अरमान मलिकने त्याच्या दोन्ही पत्नी एकाच वेळी प्रेग्रेंट असल्याची माहिती दिली आहे. ज्यामुळे नेटकऱ्यांनी त्याला जोरदार ट्रोल केले आहे. (Latest Marathi News)

यूट्यूबर आणि सोशल मीडियावरील चर्चित चेहरा म्हणून अरमान मलिक लोकप्रिय आहे. अरमान मलिकच्या दोन्ही पत्नी पायल मलिक आणि कृतिका मलिकही कंटेट क्रिएटर आहेत. अरमानची पत्नी पायलने एका मुलीला जन्मही दिला आहे. मात्र अरमानने अलिकडेच एक असा खुलासा केला आहे ज्यामुळे त्याला जोरदार ट्रोल केले जात आहे. अरमानने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन त्याच्या दोन्ही पत्नी प्रेग्नेंट असल्याची माहिती दिली आहे. अरमानने माझा परिवार असा कॅप्शन देत दोन्ही पत्नींसबोतचा एक फोटोही शेअर केला आहे ज्यामध्ये त्या बेबी बंप प्लॉंन्ट करताना दिसत आहेत.

अरमानच्या या पोस्टची मीडिया जगतात चांगलीच चर्चा रंगली असून नेटकऱ्यांनी त्यावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही नेटकऱ्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत तर अनेकांनी याबद्दल त्याला जोरदार ट्रोलही केले आहे. अनेकांनी यावर आश्चर्य व्यक्त करत एकाच वेळी दोघीही प्रेग्नंट (Pregnant) कशा असा प्रश्नही उपस्थित केला आहे. या पोस्टनंतर नेटकऱ्यांनी त्याची जोरदार खिल्ली उडवली आहे.या पोस्टवर प्रतिक्रिया देताना एका नेटकऱ्याने "तुम्हा दोघींना एकच माणूस मिळाला का?" अशी खोचक प्रतिक्रिया दिली आहे तर काही जणांनी "तुमची मजा आहे", असे म्हणले आहे. अरमानच्या या व्हायरल पोस्टवर आत्तापर्यंत १.४७ लाखापेक्षा जास्त लोकांनी लाईक केले आहे.

Armaan Malik
अरमान कोहलीला दिलासा नाहीच; मुंबई हायकोर्टाने नकारला जामीन

दरम्यान, अरमान मलिक हा लोकप्रिय युट्यूबर आहे जो इंस्टाग्रामवरही रंजक व्हिडिओ तयार करत असतो. अरमानने २०११ मध्ये पायलसोबत विवाह केला होता. त्यानंतर २०१८ मध्ये पायलची मैत्रिण (Friend) कृतिकासोबत विवाह केला. पायल आणि कृतिकासोबत अरमान एकाच घरात राहतो. अनेकदा तो त्यांचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com