Juhi Chawla
Juhi ChawlaSaam Tv

Juhi Chawla: आईची कार्बन कॉपी अन् सौंदर्याची खाण; जुही चावलाच्या लेकीला अभिनयात नव्हे 'या' क्षेत्रात करायचं आहे करिअर

जय मेहतासोबत विवाह केल्यानंतर जुहीने कुटूंबाला वेळ देण्याचा निर्णय घेतला.

Juhi Chawla With Daughter: नव्वदच्या दशकातील लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रींमध्ये जुही चावलाचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. आपल्या सहजसुंदर अभिनयाने आणि सोज्वळ सौंदर्याने तिने सिने जगतात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. बॉलिवूडमधील आघाडीच्या सर्वच कलाकारांसोबत जुहीने काम केले आहे. तिच्या ९० च्या दशकातील चित्रपटांची आजही चर्चा होताना दिसते.

उद्योजक जय मेहतासोबत विवाह केल्यानंतर जुही सिने जगतात फारशी दिसत नसली तरी सोशल मीडियावर मात्र नेहमीच सक्रिय असते. अलिकडेच जुहीची मुलगी जान्हवी चांगलीच चर्चेत आली होती. आईप्रमाणे सोज्वळ सौंदर्य लाभलेल्या जान्हवीला अभिनयात रस नसल्याचे सांगितले होते.

Juhi Chawla
Alia Bhatt: आलियाच्या सनकिसला मस्तानीची कमेंट, फोटो पाहून दीपिका म्हणाली...

अभिनेत्री जुही चावला सध्या सिने जगतात फारशी दिसत नसली तरी सोशल मीडियावर मात्र नेहमी सक्रिय असते. जय मेहतासोबत विवाह केल्यानंतर जुहीने कुटूंबाला वेळ देण्याचा निर्णय घेतला. तिला जान्हवी आणि अर्जुन अशी दोन मुली आहेत. (Juhi Chawla)

आय़पीएल लिलावावेळी जान्हवी मेहताचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. ज्यामधील तिच्या सौंदर्याने नेटकऱ्यांना भुरळ घातली होती. मात्र एका मुलाखतीत बोलताना जुहीने तिला वाचनाची सर्वात जास्त आवड असून तिला सर्वाधिक पुस्तकेच प्रिय आहेत असा खुलासा केला होता.त्याचबरोबर जान्हवीला लेखक व्हायचे असल्याचेही जुहीने सांगितले होते. (Social Media)

जुहीने सोशल मीडियावरही जान्हवीबद्दल एक पोस्ट लिहली होती. ज्यामध्ये ती म्हणाली होती की, "ती लहान होती तेव्हापासून क्रिकेट पाहायला सुरूवात केली होती. कॉमेंट्री ऐकून ती खेळातील डावपेच लक्षात घेत होती. ती १२ वर्षाची असताना आम्ही फिरायला गेलो होतो. त्यावेळी हॉटेलमध्ये एक पुस्तक होते ज्यामध्ये जगभरातील क्रिकेटपटूंच्या कथा, रेकॉर्ड होते. त्यावेळी जान्हवीने ते संपूर्ण पुस्तक वाचून काढले. हे असामान्य होते. कोणती १२ वर्षाची मुलगी असं करेल." दरम्यान, शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसोबत आयपीएल लिलावादरम्यान दिसली होती. त्यावेळी तिच्या लूकची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा झाली होती. तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. आयपीएलमध्ये कोलकात्ता नाईट रायडर संघामध्ये जुही चावलाचीही भागीदारी आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com