Pankaj Tripathi On Mirzapur Season 3 Saam TV
मनोरंजन बातम्या

Mirzapur Season 3: 'मिर्झापूरने आम्हाला स्टार बनवलं, नाहीतर आम्ही फक्त...'; पंकज त्रिपाठींनी सांगितली 'मन की बात'

Pankaj Tripathi Interview On Mirzapur Season 3: मुलाखतीत अभिनेते पंकज त्रिपाठी यांनी 'मिर्झापूर' सीरीजबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. सध्या त्यांच्या वक्तव्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.

Chetan Bodke

'ॲमेझॉन प्राईम व्हिडीओ'वरील 'मिर्झापूर'सीरीजची सध्या सोशल मीडियावर कमालीची चर्चा सुरू आहे. पहिल्या आणि दुसऱ्या सीझनला दमदार प्रतिसाद मिळाल्यानंतर आता मिर्झापूरचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'मिर्झापूर'चा तिसरा सीझन ५ जुलैपासून 'ॲमेझॉन प्राईम व्हिडीओ'वर स्ट्रीम होणार आहे. वेब सीरिजने सर्व कलाकारांना प्रसिद्धी दिली आहे. सध्या सीरीजमधील सर्व स्टारकास्ट प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. एका मुलाखतीत अभिनेते पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) यांनी 'मिर्झापूर' सीरीजबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. या वेब सीरिजच्या आधी आम्ही फक्त कलाकार होतो. या सीरिजनंतर आम्ही स्टार झालो असल्याची प्रतिक्रिया पंकज त्रिपाठी यांनी दिली.

मुलाखतीमध्ये पंकज त्रिपाठी यांनी सांगितलं की, " माझ्या करियरसाठी 'मिर्झापूर' सीरीज मैलाचा दगड ठरला आहे. कोणत्याही मुलाखतीच्या वेळी पत्रकार आम्हाला खास नावाने नाही तर फक्त 'कलाकार' म्हणूनच ओळखत होते. मिर्झापूर रिलीज होण्याआधी आम्ही फक्त एका वेबसीरीजचेच कलाकार होतो. माझ्या आयुष्यात 'मिर्झापूर' सीरीजचं स्थान फार महत्त्वाचे आहे. या सीरीजने आम्हाला एक कलाकार म्हणून खूप मोठी प्रसिद्धी दिली आहे. 'मिर्झापूर'च्या पहिल्या सीझननंतर मला सोशल मीडियावर फॅन्सचे खासकरून महिला फॅन्सचे खूप मेसेजेस यायचे."

"या सीरीजने मला दाखवून दिलं की, कालीन भैय्या कोणत्याही अन्य डॉनपेक्षा वेगळा आहे. पारंपारिक माफिया आणि डॉनपेक्षा वेगळे, प्रभावी आणि सभ्य बोलतात, नैतिक आणि विश्वासार्ह असल्याचे ढोंग करतात. कालिन भैय्या हा सामान्य गुन्हेगार नाही, यामुळेच तो इतरांपेक्षा वेगळा ठरतो. माणसांचे अनेक पैलू आहेत आणि कालीन भैय्या हे त्याचे उत्तम उदाहरण आहे." अशी प्रतिक्रिया कालिन भैय्या म्हणजेच पंकज त्रिपाठीने दिली आहे.

सीरिजमध्ये पंकज त्रिपाठीशिवाय अली फजल, श्वेता त्रिपाठी शर्मा, रसिका दुग्गल, विजय वर्मा, ईशा तलवार, अंजुम शर्मा, प्रियांशू पैनयुली, हर्षिता शेखर गौड, राजेश तेलंग, शीबा चढ्ढा, मेघना मलिकसारख्या आदी कलाकारांचा समावेश आहे.

या सीरीजचा पहिला सीझन २०१८ मध्ये रिलीज झाला होता. या सीरीजमध्ये पंकज त्रिपाठीने कालिन भैय्या अर्थात अखंडानंद त्रिपाठीचे पात्र साकारले. उत्तर प्रदेशातल्या पुर्वांचलमधील मिर्झापूर गावातील गँगस्टरचे हे पात्र आहे.

एक्सेल मीडिया अँड एंटरटेनमेंट निर्मित, 'मिर्झापूर' सीझन 3 चे दिग्दर्शन गुरमीत सिंग आणि आनंद अय्यर यांनी केले आहे. या सीरीजचे एकूण १० एपिसोड्स असणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sevai Kheer Recipe : सणासुदीला खास बनवा शेवयांची खीर, एक घास खाताच मन होईल तृप्त

Maharashtra Live News Update: पुण्यातील देविका हाइट्स इमारतीच्या टेरेसवरील टॉवर केबिनला आग

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीचे विसर्जन

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

SCROLL FOR NEXT