Mirzapur 3 : प्रतीक्षा संपली; "कर दिये है प्रबंध...", लक्षवेधी पोस्टरसह 'मिर्झापूर ३'ची रिलीज डेट आली समोर

Mirzapur 3 Released Date : गेल्या अनेक दिवसांपासून 'मिर्झापूर ३' वेबसीरीजची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता होती. अखेर या बहुप्रतिक्षित वेबसीरीजची रिलीज डेट जाहीर करण्यात आलेली आहे.
Mirzapur 3 Released Date : प्रतीक्षा संपली; "कर दिये है प्रबंध...", लक्षवेधी पोस्टरसह 'मिर्झापूर ३'ची रिलीज डेट आली समोर
Mirzapur 3 PosterSaam Tv

सध्या प्रेक्षकांची वेबसीरीजकडे सर्वाधिक कल आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच 'पंचायत ३' सीरिज रिलीज झाली. आता प्रेक्षकांना उत्सुकता आहे ती 'मिर्झापूर ३'ची. गेल्या अनेक दिवसांपासून या वेबसीरीजची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता होती. अखेर त्याचं उत्तर मिळालेलं आहे. या बहुप्रतिक्षित वेबसीरीजची रिलीज डेट नुकतीच जाहीर करण्यात आलेली आहे. 'ॲमेझॉन प्राईम व्हिडीओ'च्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवरून चाहत्यांना या सीरीजच्या रिलीज डेटबद्दल माहिती देण्यात आलेली आहे.

Mirzapur 3 Released Date : प्रतीक्षा संपली; "कर दिये है प्रबंध...", लक्षवेधी पोस्टरसह 'मिर्झापूर ३'ची रिलीज डेट आली समोर
OTT Released This Week : ‘चंदू चैंपियन’ ते ‘द बॉयज ४’.... या आठवड्यात थिएटरमध्ये आणि ओटीटीवर मनोरंजनाची मेजवानी

अवघ्या काही तासांपूर्वीच 'ॲमेझॉन प्राईम व्हिडीओ'ने कॅप्शन लिहित पोस्टर रिलीज केले आहे. 'कर दिये है प्रबंध मिर्जापूर-३ का' अशी कॅप्शन देत निर्मात्यांनी सीरीजची रिलीज डेट शेअर केलेली आहे. ५ जुलैपासून ही वेबसीरिज 'ॲमेझॉन प्राईम व्हिडीओ' या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आलेली आहे. बेकायदेशीर व्यवसाय, स्थानिक राजकारण आणि कौटुंबिक कलहानं परिपूर्ण असलेल्या या सीरिजच्या दोन सीझननी प्रेक्षकांकडून कौतुकाची थाप मिळवली. त्यामुळे तिसऱ्या सीझनसाठी प्रेक्षक कमालीचे आतुर आहेत..

'मिर्झापूर ३' मध्ये मुन्ना भैयाची भूमिका साकारणारा दिव्येंदू शर्मा दिसणार नाही, अशी जोरदार चर्चा सुरू आहे. 'मिर्झापूर २'च्या शेवटच्या एपिसोडमध्ये गुड्डू भैया आणि गोलूने मिळून एकत्र मुन्ना भैय्याला ठार करतात. तर शरद शुक्ला कालीन भैय्याला वाचवण्यात यशस्वी होतो. या सीझनमध्ये मिर्झापूरच्या सत्तेच्या खुर्चीसाठी संघर्ष सुरू राहणार आहे. ही खुर्ची कोणाला मिळणार ? या प्रश्नाचं उत्तर प्रेक्षकांना 'मिर्झापूर ३' रिलीज झाल्यावरच मिळेल.

Mirzapur 3 Released Date : प्रतीक्षा संपली; "कर दिये है प्रबंध...", लक्षवेधी पोस्टरसह 'मिर्झापूर ३'ची रिलीज डेट आली समोर
Ketaki Chitale : 'हिंदू राष्ट्र चाहिए हमें प्रधानमंत्रीजी'; अभिनेत्री केतकी चितळेची पंतप्रधान मोदींकडे मागणी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com