Ketaki Chitale : 'हिंदू राष्ट्र चाहिए हमें प्रधानमंत्रीजी'; अभिनेत्री केतकी चितळेची पंतप्रधान मोदींकडे मागणी

Ketaki Chitale Post : अभिनेत्री केतकी चितळे हिने एक इन्स्टा पोस्ट शेअर केलेली आहे. त्यामध्ये तिने 'हिंदू राष्ट्र चाहिए हमें प्रधानमंत्रीजी' अशी मागणी केलेली आहे.
Ketaki Chitale : 'हिंदू राष्ट्र चाहिए हमें प्रधानमंत्रीजी'; अभिनेत्री केतकी चितळेची पंतप्रधान मोदींकडे मागणी
Ketaki Chitale Post Saam Tv

अभिनेत्री केतकी चितळे आणि वाद हे समीकरण कायमच ठरलेलं आहे. जिथे केतकी तिथे वाद आपसुकच येतो. कायमच वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहणारी केतकी सध्या नव्या विधानामुळे चर्चेत आली आहे. ती कायमच इन्स्टाग्रामवर आपल्या विधानांमुळे चर्चेत असते. अशातच केतकीने एक इन्स्टा पोस्ट शेअर केलेली आहे. त्यामध्ये तिने 'हिंदू राष्ट्र चाहिए हमें प्रधानमंत्रीजी' अशी मागणी केलेली आहे.

Ketaki Chitale : 'हिंदू राष्ट्र चाहिए हमें प्रधानमंत्रीजी'; अभिनेत्री केतकी चितळेची पंतप्रधान मोदींकडे मागणी
Abdu Rozik Wedding : अब्दु रोझिकच्या निकाहची तारीख पुढे ढकलली, गोड क्षणाची आणखी वाट पाहावी लागणार; कारण काय?

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ जून रोजी पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा शप्पथ घेतली आहे. मोदींनी पंतप्रधानपदाची शप्पथ घेतल्यानंतर अभिनेत्री केतकी चितळे हिने त्यांच्याकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून एक मागणी केली आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो दिसत आहे. पोस्ट शेअर करताना तिने हिंदू राष्ट्र चाहिए हमें प्रधानमंत्रीजी' असं कॅप्शन देत तिने पोस्ट शेअर केलेली आहे. सध्या तिच्या ह्या इन्स्टा पोस्टची जोरदार चर्चा होत आहे.

सध्या केतकीची ही इन्स्टा पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अभिनेत्रीच्या ह्या इन्स्टा पोस्टवर अनेक युजर्सने 'हिंदुराष्ट्र' अशी कमेंट करत तिला प्रतिसाद दिलेला आहे. केतकीच्या ह्या व्हिडीओला हजारो लाईक्स मिळाले असून कमेंट्सचाही पाऊस पडत आहे. केतकीच्या कामाबद्दल बोलायचे तर, केतकी गेल्या अनेक दिवसांपासून ती फिल्म इंडस्ट्रीपासून दुर आहे. ती इन्स्टाग्राम आणि युट्यूबच्या माध्यमातून आपलं परखड मत मांडण्याचा प्रयत्न करत असते. तिच्या सोशल मीडिया पोस्टची कायमच चर्चा होते. केतकीला सर्वाधिक प्रसिद्धी स्टार प्रवाहवरील 'आंबट गोड' मालिकेतून मिळाली आहे.

Ketaki Chitale : 'हिंदू राष्ट्र चाहिए हमें प्रधानमंत्रीजी'; अभिनेत्री केतकी चितळेची पंतप्रधान मोदींकडे मागणी
Kalki 2898 AD Trailer : 'डरो मत, एक नया युग आ रहा है'; 'कल्की २८९८ एडी'चा धमाकेदार ट्रेलर रिलीज

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com