Nawazuddin Siddiqui  Saam TV
मनोरंजन बातम्या

Nawazuddin Siddiqui: मी सगळ्यात कुरुप अभिनेता; नवाजुद्दीन अचानक असं का म्हणाला?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

स्नेहा ढवळे, साम टीव्ही

‘इंडियन एंटरटेनमेंट इंडस्ट्री' ही गेल्या काही वर्षांत जगातील सर्वात मोठी इंडस्ट्री नावारुपाला आली आहे. भारतीय सिनेमा जागतिक पातळीवर मोठा होतो आहे. पण बॉलिवूडच्या ग्लॅमरस दुनियेतली घराणेशाही, बॉलिवूडमध्ये असलेलं वर्णभेदाचं वातावरण, वंशवाद हा काही नवा नाही . तुम्ही जर स्टार किड्स असाल तर बॉलिवूडमध्ये करिअर बनविण्यास फारशी अडचण नसते, तर इतरांना अडचणी येतात हेसुद्धा तितकंच खरं.

याबद्दलच्या अनेक चर्चा आपण नेहमी पाहत आणि ऐकत असतो. पण आपल्याकडे अनेक प्रतिभावान कलाकार उदयास येत आहेत हेही नाकारुन चालणार नाही. बॉलिवूडच्या अशाच प्रतिभावान, गुणी आणि अष्टपैलू कलाकारांपैकी एक म्हणजे अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी. अभिनेता हा गोरा गोमटा, देखणा, पिळदार शरिरयष्टीचाच असला पाहिजे, हे समीकरण नवाजुद्दीननं आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर मोडून काढलं.

नवाजुद्दीनच्या फिल्मी करिअरची सुरुवात झाली दिग्दर्शक प्रशांत भार्गव यांच्या 'पतंग' सिनेमाच्या माध्यमातून. ब्लैक फ्राइडे, गैंग्स ऑफ वासेपुर, चंगेज, डुओलॉजी, रमन राघव अशा सिनेमांमधून नवाजुद्दीन प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात राहिला. पण या यशानंतरही नवाजुद्दीन अनेकांना आकर्षक वाटत नाही. नुकत्याच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नवाजुद्दीननं नेमकं हेच बोलून दाखवलं आहे. काही लोक आपल्या दिसण्याचा इतका तिरस्कार का करतात. हे एक न उमगलेले कोडे असल्याची भावना नवाजुद्दीननं व्यक्त केलीये. कदाचित आपण तेवढेच कुरूप असू. जेव्हा मी स्वत:ला आरशात पाहतो तेव्हा मला हे जाणवलं आहे.

एवढा कुरूप चेहरा घेऊन आपण फिल्म इंडस्ट्रीमध्ये का आलो असा प्रश्नदेखील आपल्याला पडल्याचं तो म्हणतो. पण हे सगळं बोलत असताना बॉलिवूडचे आभार मानायलाही विसरत नाही. सिनेमांमध्ये कायम वेगवेगळ्या भूमिका करण्याची संधी दिल्याबद्दल आपण इंडस्ट्रीमधल्या अनेक दिग्दर्शकांचे नवाजुद्दीननं आभार मानले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Marathi 5 Winner: अखेर तो क्षण आला! 'सुरज'चा गोलीगत विजय, ठरला बिग बॉस मराठी 5 व्या पर्वाचा विनर; मिळाले 'इतके' लाख रुपये

IND vs BAN: अर्शदीप सिंगच्या गतीसमोर बांगलादेशचा सुपडा साफ; भारतापुढे माफक आव्हान

Marathi News Live Updates : उद्योजक जितेंद्र तोरणे यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश, श्रीरामपूरमधून उमेदवारीसाठी इच्छुक

Ashok Saraf: महाराष्ट्राच्या महानायकाची पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर धमाकेदार एन्ट्री

Arabian Sea Shiv Smarak : अरबी समुद्रात शिवस्मारकाचा संभाजीराजेंकडून शोध, जलपूजन झालेलं शिवस्मारक गेलं कुठं?

SCROLL FOR NEXT