Arjun Rampal Faced Microsoft Global Outage Saam Tv
मनोरंजन बातम्या

Microsoft Outage At Mumbai Airports : मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हिसचा सेलिब्रिटींना फटका, अर्जन रामपालही मुंबई विमानतळावर तासभर अडकला

Arjun Rampal Faced Microsoft Global Outage : मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचा फटका एका बॉलिवूड अभिनेत्यालाही बसला आहे. त्यामुळे अभिनेत्याला दुसऱ्या विमानाचे तिकीट काढून प्रवास करावा लागला आहे.

Chetan Bodke

अख्ख्या जगासाठी शुक्रवारचा दिवस (१९ जुलै) डोकेदुखीचा दिवस ठरला. अचानक काल सकाळी मायक्रॉसोफ्टच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे सर्वांचीच तारांबळ उडाली. बँक, एयरपोर्ट, टेलिकम्युनिकेशन कंपनी, हॉस्पिटल सह अनेक कंपन्यांचे जगभरात काम ठप्प झाले.

मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचा फटका एका बॉलिवूड अभिनेत्यालाही बसला आहे. काल अभिनेता अर्जुन रामपाल मुंबई विमानतळावर स्पॉट झाला. यावेळी तो मुंबईहून विमानाने प्रवास करत होता. मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे अभिनेत्याला दुसऱ्या विमानाचे तिकीट काढून प्रवास करावा लागला आहे.

अभिनेता त्याच्या नियोजित फ्लाईटने प्रवास करणार होता. पण मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे अनेक प्रवाशांसह अभिनेत्यालाही अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. "अचानक काल सकाळी मायक्रॉसोफ्टच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे सर्वांप्रमाणेच माझीही तारांबळ उडाली. नेमकं काय घडलंय ते त्यांनाच माहितीये. मी विमानाने प्रवास करणार होतो. आता मी दुसऱ्या विमान कंपनीची तिकिटे काढली आहेत. मी माझ्या पुढच्या प्रवासाला जात आहे." अशी प्रतिक्रिया अभिनेत्याने माध्यमांसोबत संवाद साधताना दिली आहे.

मायक्रोसॉफ्ट युजर्सचे काल अचानक कम्प्युटर आणि लॅपटॉप क्रॅश झाले. स्क्रीन निळ्या रंगाची झाली. त्याशिवाय दिल्ली विमानतळावरील स्क्रीन्स ब्लँक झाली होती. ही समस्या जगभरात होती. यामुळे अनेक विमान लँडिंग आणि टेक ऑफ झाले नाहीत. अर्जुन रामपालच्या कामाविषयी सांगायचे तर, अर्जुन रामपाल शेवटचा विद्युत जामवालसोबत 'क्रॅक' या चित्रपटात दिसला होता. नोरा फतेही आणि एमी जॅक्सनही या चित्रपटात मुख्य भूमिकेत होता. अर्जुन रामपाल आता लवकरच अक्षय कुमार आणि रितेश देशमुखसोबत साजिद नाडियादवाला निर्मित 'हाऊसफुल ५' या कॉमेडी ड्रामामध्येही दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यात भयंकर घडलं! जेवणासाठी घरी बोलवलं, दारू पाजली; किरकोळ वादातून तरुणाची दगडाने ठेचून हत्या

Youth Drowned: तलाव पाहून पोहण्याचा मोह आला अन् अनर्थ घडला; २० वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू

Politics : पंतप्रधान नरेंद्र मोदी विष्णूचे ११वे अवतार; कुणी केलं विधान? वाचा

'Saiyara' तू तो बदला नहीं है... या ट्रेंडींग गाण्याचा अर्थ काय?

Asia Cup 2025 schedule : भारत-पाकिस्तान भिडणार, तारीख ठरली! आशिया चषक स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक

SCROLL FOR NEXT