गर्लफ्रेंडशी झालेल्या भांडणातून मुंबई विमानतळ आणि हॉटेलमध्ये बॉम्बस्फोटाची धमकी देणाऱ्या माथेफीरूला उत्तर प्रदेशप्रदेशमधून अटक करण्यात आली आहे. अरविंद राजपूत या माथेफिरूचं नाव असून धमकी दिल्यानंतर गर्लफ्रेंडचा नंबर पोलिसांना देऊन मोकळा झाला होता. आरोपीला घेऊन मुंबई पोलिसांचं पथक मुंबईच्या दिशेने रवाना झालं आहे.
मुबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन आला आहे. एका अज्ञात व्यक्तीने मुंबई पोलिसांना फोन करून ताज हाॉटेल आणि मुंबई विमानतळसह इतर ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची धमकी दिली आहे. सोमवारी दुपारी पोलिसांना हा फोन आला होता. धमकीचा फोन येतात मुंबई पोलीस अलर्ट मोडवर होते. पोलिसांनी फोन लोकेशन तपासले असता हा फोन उत्तर प्रदेशमधून आला असल्याचं प्राथमिक चौकशीत उघड झालं होतं.
धमकीनंतर मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेलपरिसरात पोलीस बंदोबस्त वाढवला होता. गस्तही वाढवण्यात आली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांचं एक पथक उत्तर प्रदेशकडे रवाना झालं होतं. उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने पोलीस त्या माथेफीरूपर्यंत पोहोचले, मात्र त्या माथेफीरूने दिलेलं कारण ऐकून पोलिसांच्या तळपायाची आग मस्तकात गेली.
अरविंद राजपूत या माथेफिरूचं त्याच्या गर्लफ्रेंडशी भांडण झालं होतं आणि या रागातून त्याने कायतरी मोठं करायंच ठरवलं. त्याने थेट मुंबई पोलिसांची नियंत्रण कक्षाला फोन लावला. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि प्रसिद्ध ताज हॉटेलला उडवून देऊ अशी धमकी दिली.धमकी दिल्यानंतर गर्लफ्रेंडचा नंबर पोलिसांना देऊन झाला होता मोकळा झाला. पोलीस आता त्याला घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.