मायक्रोसॉफ्टचा वापर करणाऱ्या अनेक युजर्संच्या लॅपटॉप आणि कॉम्प्युटरच्या स्क्रिनवर एरर येऊ लागल आहे. गेल्या तासाभरापासून मायक्रोसॉफ्टची सेवा ठप्प पडली आहे. यामुळे एअरलाइन्ससह बँकेच्या विविध कामांमध्ये अडथळा येताना दिसत आहे. तसेच ही सेवा ठप्पा पडली आहे. आलेल्या एररचा एक स्क्रिनशॉट काही यूजर्सनी आपल्या सोशल मिडिया अकाउंटवर पोस्ट केला आहे. हा स्क्रिनशॉट देखील आता व्हायरल होत आहे.
एअरलाइन्सला मोठा फटका
मायक्रोसॉफ्टमध्ये अडथळा सुरू झाल्याने देशातील ६ विमानतळांवर सर्व्हर डाऊनचा फटाका बसला आहे. दिल्ली आणि मुंबई विमानतळावर ही परिणाम झाला आहे. आलेल्या अडचणीमुळे सर्व विमान कंपन्यांनी प्रवाशांसाठी काही मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.
इंडिगो एअरलाइन्सने याबाबत एक्स अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. "आमच्या सिस्टमवर सध्या Microsoft आउटेजचा परिणाम झाला आहे. त्यामुळे बुकिंगसह चेकइनवर याचा अडथळा येत आहे. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीरी व्यक्त करत आहोत.", असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
CrowdStrike कडून निवेदन जारी
दरम्यान, या अडचणीनंतर सायबर सुरक्षा कंपनी CrowdStrike कडून एक निवेदन जारी करण्यात आलं आहे. जर तुमच्या कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपमध्ये ब्लू स्क्रीन ऑफ डेथ (बीएसओडी) ची समस्या येत असेल तर तुम्ही स्वताहून ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू नका. तुम्हाला स्क्रिनवर पुढील तांत्रिक सूचना दिल्या जातील. त्यानुसारच तुम्हाला पुढे स्किन हाताळावी लागेल. CrowdStrike सध्या या समस्येचे निराकरण करण्यासाठी काम करत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.