Bigg Boss Marathi 6 saam tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 6 : कोण Safe अन् कोण Danger Zone मध्ये? बिग बॉसच्या घरात पार पडला नॉमिनेशन टास्क, पाहा VIDEO

Bigg Boss Marathi 6-Nomination Task : बिग बॉसच्या घरात नॉमिनेशन टास्क पार पडला आहे. घरातील कोणते सदस्य तिसऱ्या आठवड्यात नॉमिनेट झाले, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

बिग बॉसच्या घरात पुन्हा एकदा चोरी झाली आहे.

तिसऱ्या आठवड्याचा नॉमिनेशन टास्क घरात पार पडला आहे.

नॉमिनेशन टास्क दरम्यान घरातील सदस्यांमध्ये भांडणे होतात.

बिग बॉसचा सध्या तिसरा आठवडा सुरू आहे. घरात नुकताच नॉमिनेशन टास्क पार पडला आहे. 'Mr. India' असे नॉमिनेशन टास्कचे नाव आहे. बिग बॉस म्हणतात की, "घरात न दिसणाऱ्या सदस्यांसाठी पार पडणार नॉमिनेशन कार्य..." त्यानंतर घरातील सदस्यांच्या दोन दोनच्या जोड्या बनतात. एक जोडी दुसऱ्या जोडीतील सदस्यांचा घरातील वावर किती कमी होता, हे सांगताना दिसत आहे.

राकेश आणि रुचिताची जोडी बनते. राकेश रुचिताला म्हणतो की, "ही खूप कमी दिसलीय... " त्यानंतर घरातील इतर जोड्या एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसतात. बाकी जोड्यांमध्ये वाद होतात. शेवटी बिग बॉस म्हणतात की, "आपण निर्णय घेण्यास असक्षम आहात. आता निर्णय बिग बॉसने घेतलाय..." हे ऐकताच घरातील सदस्यांना टेन्शन येते.

पहिल्या फेरीत दीपाली सय्यद-दिव्या शिंदे यांना नॉमिनेट करायला सागर-ओमकार येतात. ओमकार दिव्याची बाजू घेतो. तर सागर दीपालीच्या बाजू घेतो. त्यामुळे घरात वाद होतो. तेव्हा बिग बॉस सोनाली आणि आयुषला दीपाली-दिव्यापैकी एकीला नॉमिनेट करायला सांगतात. तेव्हा सोनाली-आयुष एकमताने दीपाली नॉमिनेट करतात आणि दिव्याला सुरक्षित करतात. दुसऱ्या फेरीत तन्वी-राकेशची जोडी विशाल-अनुश्रीला नॉमिनेट करायला येतात. तेव्हा दोघे एकमताने विशालला नॉमिनेट करतात.तिसऱ्या फेरीत प्रभू- सचिन यांची जोडी बनते. त्यांना नॉमिनेट करायला करण-प्राजक्ता येतात. तेव्हा दोघे एकमताने प्रभूला नॉमिनेट करतात.

एकंदर आतापर्यंत घरातील तीन सदस्य तिसऱ्या आठवड्यात घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत. यात दीपाली सय्यद, विशाल आणि प्रभू यांचा समावेश आहे. आता तिसऱ्या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून कोण बाहेर जाणार आणि कोण घरातच राहणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 'बिग बॉस मराठी ६' हा शो रात्री 8 वाजता 'कलर्स मराठी' आणि 'जिओहॉटस्टार'वर पाहायला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budget 2026: नवरा-बायकोला एकत्र फाइल करता येणार इन्कम टॅक्स, सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Buldhana : मध्यरात्री अग्रवालांच्या घरात सशस्त्र दरोडा, बाप-लेकावर तलवारीने वार, अन्...

Bigg Boss Marathi 6 : बिग बॉसच्या घरात पुन्हा चोरी; विशालने थेट कॅप्टन आयुषवर केले आरोप, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: केडीएमसीत हालचालींना वेग; भाजपचे ५० नगरसेवक कोकण भवनाकडे होणार रवाना

गुडन्यूज! लाडकीच्या खात्यात ₹२१०० येणार, एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा, नेमकं काय म्हाणाले

SCROLL FOR NEXT