Bigg Boss Marathi 6 : बिग बॉसच्या घरात पुन्हा चोरी; विशालने थेट कॅप्टन आयुषवर केले आरोप, पाहा VIDEO

Vishal Kotian Blames Ayush Sanjeev Is Theft : बिग बॉसच्या घरात पुन्हा एकदा चोरी झाली आहे. विशालने थेट कॅप्टन आयुषवर चोरीचा आरोप केला आहे. नेमकं प्रकरण काय, जाणून घेऊयात.
Vishal Kotian Blames Ayush Sanjeev Is Theft
Bigg Boss Marathi 6saam tv
Published On
Summary

बिग बॉसच्या घराचा नवा कॅप्टन आयुष संजीव बनला आहे.

बिग बॉसच्या घरात पुन्हा चोरी झाली आहे.

विशाल आयुषवर चोरीचा आरोप करतो.

बिग बॉसचा खेळ दिवसेंदिवस रंगताना दिसत आहे. नृत्यांगना राधा पाटीलने बिग बॉसच्या घराचा निरोप घेतला आहे. त्यानंतर घरात नॉमिनेशन टास्क रंगतो. अशात आता बिग बॉसच्या घरात पुन्हा एकदा चोरी झाली आहे. बिग बॉसने नुकत्याच शेअर केलेल्या प्रोमोमध्ये याचा खुलासा झाला आहे. व्हिडीओमध्ये विशाल आयुष्यवर चोरीचा आरोप करताना दिसत आहे.

विशाल कोटियनने बिग बॉसच्या घराचा कॅप्टन आयुष संजीववर त्याचे बॉडीवॉश चोरल्याचा आरोप केला आहे. बिग बॉसच्या नवीन प्रोमोमध्ये तुम्ही पाहू शकता की, विशाल घरातील सदस्यांना म्हणतो की, "काही दिवसांपूर्वी माझे पूर्ण बॉडीवॉश हरवले होते. चोरी एक वृत्ती आहे. असे आपण किती वेळा ऐकले आहे. आमच जेवण बंद केले होत तुम्ही, तीन वेळा...तर आता मला कॅप्टन रूममधून हे भेटले..." असे बोलून विशाल बॉडीवॉशची बॉटल घरातील सदस्यांसमोर खाली टाकतो.

आता कॅप्टन झाल्यामुळे आयुष कॅप्टन्सी रूमध्ये राहताना दिसतो. त्यामुळे विशालने केलेल्या आरोपावर उत्तर देत आयुष्य म्हणतो की, "ते किती दिवसांपासून, पहिल्यापासून तिथेच आहे..." त्यावर विशाल पुन्हा म्हणतो की, "घरातील सदस्यांनो तुम्ही ठरवा की, कुणाचे जेवण बंद करायचे..." आता यावरून घरात नवीन वाद होताना दिसणार आहे. आता खरंच आयुषने चोरी केली की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

अलिकडेच घरात विशालने देखील अंडी चोरी होती. त्यामुळे त्याचे जेवण बंद झाले होते. मग आता आयुष संजीवला शिक्षा मिळणार की तो आपल्या कॅप्टन्सी पावरचा वापर करणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे. 'बिग बॉस मराठी ६' हा शो रात्री 8 वाजता 'कलर्स मराठी' आणि 'जिओहॉटस्टार'वर पाहायला मिळणार आहे.

Vishal Kotian Blames Ayush Sanjeev Is Theft
Border 2 Collection : पैसाच पैसा; प्रजासत्ताक दिनाला 'बॉर्डर 2' ची बक्कळ कमाई, 'पुष्पा', 'जवान', 'टाइगर'लाही पछाडलं- बनवला जबरदस्त रेकॉर्ड

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com