'बिग बॉस मराठी ६' शो 11 जानेवारीपासून सुरू झाला आहे.
'बिग बॉस मराठी ६' रितेश देशमुख होस्ट करत आहे.
पहिल्याच दिवशी घराचे दार बंद झाले आहे.
अखेर 'बिग बॉस मराठी ६'ची रंगतदार सुरूवात झाली आहे. काल (11) जानेवारीला शोचा ग्रँड प्रीमियर पार पडला. यात रितेश भाऊंना आपल्या हटके स्टाइलने प्रेक्षकांचे आणि घरातील सदस्यांचे स्वागत केले. 'बिग बॉस मराठी ६'मध्ये यंदा 17 स्पर्धकांनी धमाकेदार एन्ट्री घेतली आहे. घरात दोन दार पाहायला मिळाली. पहिलं 'शॉर्टकट दार' आणि दुसरे 'मेहनतीचं दार' यात फक्त ६ सदस्यांनी शॉर्टकट दार उघडलं.
'बिग बॉस मराठी ६' चा खेळ सुरू झाला आहे. 17 स्पर्धक एकमेकांसमोर आले आहेत. अशात 'बिग बॉस' ने शोचा पहिला प्रोमो शेअर केला आहे. ज्यात पहिल्याच दिवशी घरात राडा झाला आहे. बिग बॉसने घराचे दार बंद केले आहे. पहिल्याच टास्कने सदस्यांची झोप उडवली आहे. व्हिडीओमध्ये पाहू शकता की, बिग बॉसने एक बझर टास्क दिलेला असतो. मुख्य प्रवेशद्वाराजवळ बझर ठेवण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. पण घरातील कोणताच सदस्य बझर वाजत नाही. त्यामुळे शिक्षा म्हणून बिग बॉसने घराचे दार बंद केले आहे.
व्हिडीओच्या शेवटी बिग बॉस बोलताना दिसतात की, "कोणीच बझर वाजवून तुफान थांबवण्याचा प्रयत्न केला नाही, त्यामुळे घर तुम्हा सर्वांसाठी बंद होतंय..." यामुळे पहिल्याच दिवशी सदस्य घराबाहेर आले आहेत. सर्वजण गार्डन एरियामध्ये पाहायला मिळत आहेत. व्हिडीओमध्ये घरातील सदस्य एकमेकांशी चर्चा करताना दिसत आहेत.
'बिग बॉस मराठी ६' हा सीझन 100 दिवसांचा असणार आहे. यंदाची थीम 'दार उघडणार आणि नशिबाचा खेळ पालटणार...' आहे. 'बिग बॉस मराठी ६' हा शो रात्री 8 वाजता 'कलर्स मराठी' आणि ‘जिओहॉटस्टार’वर पाहायला मिळणार आहे. आता घराचे दार पुन्हा कधी उघडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.