UPSC
UPSC Saam Tv

२७५६४ रुपयांत IAS व्हा; UPSC करणाऱ्या प्रत्येक तरुणाची झोप उडवणारी बातमी; नेमकं प्रकरण आहे तरी काय?

UPSC Fraud News: यूपीएससी परीक्षेच्या नावाखाली फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. फक्त २७५६४ रुपयांत IAS झाल्याचे मार्कशीट एका तरुणाला देण्यात आले. त्याच्याकडून पैसे उकळण्यात आले.
Published on
Summary

यूपीएससीच्या नावाखाली तरुणाची फसवणूक

२७ हजारात बनवून दिलं खोटा यूपीएससी रिझल्ट

यूपीएससीच्या विद्यार्थ्यांना ही गोष्ट माहित असायलाच हवी

केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्यासाठी दिवसरात्र मेहनत करावी लागते. देशातील लाखो तरुण दरवर्षी यूपीएससी परीक्षा देतात. आयएएस, आयपीएस होण्याचे अनेकांचे स्वप्न असते. यासाठी यूपीएससीसाठी वेगवेगळ्या ठिकाणी क्लास लावतात. दरम्यान, यूपीएससी परीक्षा देणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. यूपीएससी करणाऱ्या तरुणांसोबत फसवणूक झाली आहे

 UPSC
Success Story: भावाच्या पावलावर पाऊल! मोठा भाऊ IAS, लहान भावानेही क्रॅक केली UPSC; उत्कर्ष यादव यांचा प्रेरणादायी प्रवास

बनावट UPSC निकाल घेऊन LBSNAA गाठलं

एका तरुणाने थेट स्वतः चा खोटा यूपीएससी रिझल्ट तयार करुन घेतला. हा रिझल्ट घेऊन तो ट्रेनिंग घेण्यासाठी दाखल झाला. बिहारच्या पुष्पेंद्र सिंग याने या गोष्टी केल्या आहे. तो गुरुग्राममधील खाजगी कंपनीत काम करतो. गेल्या शनिवारी तो LBSNAA येथे गेला. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, LBSNAA येथे एक तरुण यूपीएससीचा खोटा निकाल घेऊन प्रशिक्षणासाठी आला होता. त्याने यूपीएससी परीक्षेत निवड झाल्याचा खोटा दावा केला होता. या घटनेनंतर चौकशी सुरु झाली.

 UPSC
Success Story: चालताना अडचणी, नीट बोलता येत नव्हते, दिव्यांग असूनही क्रॅक केली UPSC; IRS मानवेंद्र सिंह यांचा प्रवास

प्राथमिक तपासात असे दिसून आले की, पुष्पेंद्र सिंग यांची आयएएस-आयपीएस बनवण्याच्या नावाखाली फसवणूक झाली झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुष्पेंद्र यांच्याशी गुरुग्राममधील काही लोकांनी संपर्क साधला. त्यांनी परीक्षा आणि मुलाखतीच्या नावाखाली दोनदा पैसे लाटले. यूपीआयद्वारे एकदा १३००० रुपये तर दुसऱ्यांदा १४,५६४ रुपये घेतले.

व्हॉट्सअॅपवर पाठवला निकाल

चौकशीदरम्यान एक महत्त्वाची माहिती समोर आली. त्याची यूपीएससी परीक्षेत निवड झाली असा निकाल त्याला व्हॉट्सअॅपवर मिळाला. त्याला प्रशिक्षणासाठी LBSNAA येथे उपस्थित राहण्यास सांगितले. जेव्हा हा तरुण पालकांसोबत पहिल्यांदा LBSNAA येथे आला तेव्हा त्याची फसवणूक झाली असल्याचे समजले. यानंतर मसूरी पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. यानंतर आता पुढील तपासासाठी प्रकरण गुरुग्राम पोलिसांकडे सोपवण्यात आले आहे.

 UPSC
Success Story: चालताना अडचणी, नीट बोलता येत नव्हते, दिव्यांग असूनही क्रॅक केली UPSC; IRS मानवेंद्र सिंह यांचा प्रवास

यूपीएससीच्या विद्यार्थ्यांनी ही काळजी घ्या (UPSC Students Must Aware of These Things)

जर यूपीएससी परीक्षेची तयारी करत असाल तर कोणत्याही मेसेजला बळी पडू नका. यूपीएससीबाबत सर्व माहिती तुम्हाला (upsc.gov.in) किंवा upsconline.nic.in या वेबसाइटवर दिली जाते. परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या नावाखाली जर पैशाची मागणी करत असतील तर त्यांच्यापासून सावध राहा. पोलिसांना या घटनेची माहिती द्या.

 UPSC
Success Story: आधी डॉक्टर, मग IPS; एकदा नव्हे तर दोनदा UPSC क्रॅक; IPS अर्पित जैन यांचा प्रेरणादायी प्रवास

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com