Fraud Case : मंत्रालयात लिपिक पदासाठी घेतल्या मुलाखती; आमिष देत गंडा घालणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, दोघे अटकेत

Nagpur News : लिपिक पदासाठी मंत्रालयाच्या एका कक्षात मुलाखत घेतली. मात्र २०१९ मध्ये पैसे घेऊन नियुक्ती पत्र न दिल्यामुळे तायडे यांनी नागपूरच्या हुडकेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दिली
Fraud Case
Fraud CaseSaam tv
Published On

पराग ढोबळे 

नागपूर : बेरोजगार असलेल्या तरुणांना गाठून नोकरी लावण्याचे आमिष दाखवत फसवणूक करण्यात आल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. असाच प्रकार नागपूरमध्ये समोर आला असून नोकरी देण्याचे सांगून थेट मंत्रालयात मुलाखती घेत अनेकांना गंडा घालण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

नागपुरात हा प्रकार उघडकीस आला असून दोन तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून मंत्रालयात त्यांच्या मुलाखती घेऊन लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान नागपूर येथील राहुल तायडे यांना मंत्रालयात कनिष्ठ लिपीकाची नौकरी लावून देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. तायडे नौकरीच्या शोधात असताना त्याच्या मित्राबरोबर लॉरेन्स हेनरी त्याच्या घरी आला. त्यांनी मंत्रालयात नौकरी लावून देतो असे सांगितले.

Fraud Case
Mumbra Railway Accident : मुंब्रा रेल्वे अपघातात मुलगा गेला; उल्हासनगरातील सरोज कुटुंबीयांची अवस्था बिकट, रेल्वेकडून घोषित मदतीची प्रतीक्षा

मंत्र्यालायात सात जणांनी घेतली मुलाखत 

त्यानुसार तायडे यांची जे जे रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर पुढील प्रक्रिया म्हणून त्यांना मुलाखतीसाठी मंत्रालयात बोलावून सात जणांनी मिळून मंत्रालयात मुलाखत देखील घेतली. मंत्रालयात शिल्पा उदापुरे अशा नावाची पाटी लावलेल्या कक्षात तायडे याची मुलाखत घेण्यात आली होती. मात्र आरोपींनी २०१९ मध्ये पैसे घेऊन नियुक्ती पत्र न दिल्यामुळे तायडे यांनी नागपूरच्या हुडकेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

Fraud Case
Leopard Attack : डोळ्यादेखत चिमुकल्याला बिबट्याने नेले फरफटत; आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश

सहा आरोपी अद्याप फरार 

मात्र यातून ९ लाख ५५ हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करत एकाला अटक करण्यात आली. त्यानंतर लॉरेन्सला अटक करण्यात आली असून शिल्पा उदापुरे, वसंतकुमार उदापूरे, विजय पाटणकर, नितीन साठे, सचिन डोळस , आणि बाबर नावाचा शिपाई हे सहा आरोपी अद्याप फरार आहेत. तर मंत्रालयातील काही कर्मचाऱ्याचे याच्याशी धागेदोरे आहे का? या बाजूने पोलिसाचा तपास सुरू आहे. दरम्यान याच प्रकरणात आतापर्यंत नागपूर, चंद्रपूर आणि वर्धा येथील पोलिस स्टेशनला वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com