Mumbra Railway Accident : मुंब्रा रेल्वे अपघातात मुलगा गेला; उल्हासनगरातील सरोज कुटुंबीयांची अवस्था बिकट, रेल्वेकडून घोषित मदतीची प्रतीक्षा

Ulhasnagar News : मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ दोन लोकल ट्रेन एकमेकांना घासल्या गेल्याने पाच रेल्वे प्रवाशांचा मृत्यू झाला होता. मृतांच्या कुटुंबियांना मदत देण्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले होते
Mumbra Railway Accident
Mumbra Railway AccidentSaam tv
Published On

उल्हासनगर : मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ साधारण चार महिन्यांपूर्वी म्हणजे ९ जून रोजी झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. यात उल्हासनगरमधील केतन सरोज याचा समावेश होता. अपघातातील मृतांना रेल्वेने मदतीची घोषणा केली होती. पण चार महिने उलटूनही सरोज कुटुंबाला आजतागायत मदत मिळालेली नाही. कुटूंबाचा कर्ता मुलगा एकूणच आधार गेल्याने कुटुंबाची अवस्था बिकट आहे. 

मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या अपघातात केतन सरोज याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर कुटुंबात पाच जणांचे आयुष्य अंधारले आहे. रेल्वेकडून मदतीची फक्त आश्वासने मिळाली, पण अद्याप एकही रुपया किंवा नोकरी मिळाली नाही. आई- वडील, लहान भाऊ आणि कुटुंबातील इतर सदस्य आज रोजीरोटीच्या चिंतेत आहेत. घरचा आधार गेलेला आणि भविष्य काय होणार याची काळजी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसते. 

Mumbra Railway Accident
Farmer : आठ महिन्यात ११८३ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले; पश्चिम विदर्भात सर्वात मोठा आकडा आला समोर

आईच्या डोळ्यातले पाणी थांबेना 

आईसाठी मुलगा गमावण्यापेक्षा मोठं दुःख कोणतं असतं? केतनच्या आई संगीता सरोज यांच्या डोळ्यांतून वाहणारं पाणी त्यांची व्यथा सांगून जाते. माझा मुलगा गेला, आता आमच्या घरी कुणीही कमवणारा नाही. जर माझ्या मुलाला रेल्वेत नोकरी मिळाली; तर कुठेतरी आमच्या घराचा उदरनिर्वाह चालेल.” असं केतनची आई सांगते. 

Mumbra Railway Accident
Rahuri Rasta Roko : नगर- मनमाड महामार्ग रोखला; रस्त्याच्या कामासाठी नागरिक आक्रमक

रेल्वेची मदत पोहचणार कधी 

माझ्या भावाच्या जाण्यानंतर आमच्या घराची परिस्थिती खूप बिकट झाली आहे. घरात कोणीही कमवणारा नाही. रेल्वेने ज्या मदतीची घोषणा केली होती, ती लवकर मिळावी हीच आमची अपेक्षा आहे.” असं केतनच्या भावाचं म्हणणं आहे. तर घरातील मुलगा गेल्याने त्याच्या कुटुंबाचे आयुष्य अजूनही अडचणीत आहे. दरम्यान रेल्वेने दिलेली आश्वासने कधी प्रत्यक्षात येतात, याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com