Suraj Chavan Wedding saam tv
मनोरंजन बातम्या

Suraj Chavan Wedding : अजितदादा, रितेश देशमुख, अशोक मामा; सूरज चव्हाणच्या लग्नात दिसणार सेलिब्रिटींची मांदियाळी, पाहा पाहुण्यांची यादी

Suraj Chavan Wedding Invitation Card : गुलीगत किंग सूरज चव्हाण लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत. सूरजच्या शाही लग्न सोहळ्यात कोण कोण येणार, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

सूरज चव्हाणच्या लग्न सोहळ्यात दिग्गज सेलिब्रिटी पाहायला मिळणार आहेत.

सूरज चव्हाण त्याच्या मामाची मुलगी संजनासोबत लग्न करणार आहे.

सूरज चव्हाणच्या व्हायरल होणाऱ्या लग्नपत्रिकेत राजकारणी ते बॉलिवूडचे सुपरस्टार यांची नावे पाहायला मिळत आहेत.

आता काही तासात सूरज चव्हाण बोहल्यावर चढणार आहे. सध्या सोशल मीडियावर सूरज चव्हाणच्या लग्नाची पत्रिका आणि लग्नात आमंत्रण केलेल्या पाहुण्याची यादी तुफान व्हायरल होत आहे. यात राजकारणी ते बॉलिवूडचे सुपरस्टार यांची नावे पाहायला मिळत आहे. सूरज चव्हाणचे लग्न हे एखाद्या मोठ्या इव्हेंटपेक्षा कमी नाही. सूरजच्या लग्नात मराठी इंडस्ट्रीतील दिग्गज कलाकारांना देखील आमंत्रण देण्यात आले आहे.

व्हायरल होणाऱ्या आमंत्रण पत्रिकेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांची बायको सुनेत्रा पवार यांची नावे दिसत आहेत. तसेच सुप्रिया सुळे यांच्यासोबत अनेक मोठे राजकारणी मंडळींना सूरजच्या लग्नाचे आमंत्रण देण्यात आले आहे. सूरज चव्हाणच्या व्हायरल होणाऱ्या लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेत बॉलिवूडच्या सुपरस्टार लोकांची नावे पाहायला मिळत आहे. यात 'बिग बॉस मराठी 5' चा होस्ट रितेश देशमुखचे नाव आहे. तसेच बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारला देखील निमंत्रण देण्यात आले आहे.

मराठी मनोरंजन सृष्टीतील दिग्गज कलाकार अशोक सराफ आणि केदार शिंदे यांना देखील लग्नाचे आमंत्रण दिले आहे. तसेच सूरजच्या लग्नात गायकांना देखील निमंत्रण देण्यात आले आहेत. यात चंदन कांबळे, अंकिता वालावलकरचा नवरा कुणाल भगत, उत्कर्ष शिंदे यांची नावे दिसत आहेत. सूरज चव्हाण 29 नोव्हेंबर 2025 थाटामाटात लग्न करणार आहे. संध्याकाळी 6.11 चा लग्नाचा मुहूर्त ठरवण्यात आला आहे. सूरज चव्हाणचे लग्न माऊली गार्डन हॉलवर होणार आहे. हे ठिकाण सासवड-जेजुरी रोड, पुरंदर तालुक्यात , पुणे जिल्ह्यात आहे.

'बिग बॉस मराठी 5' ची सर्व टीम

सूरज चव्हाणच्या लग्न सोहळ्याचे आमंत्रण 'बिग बॉस मराठी 5' च्या सर्व टीमला देण्यात आले आहे. यात अभिजीत सावंत, वर्षा उसगांवकर, अंकिता वालावलकर, जान्हवी किल्लेकर, निक्की तांबोळी, धनंजय पोवार, पंढरीनाथ कांबळे, आर्या जाधव, इरीना, अभिषेक करंगुटकर, अरबाज पटेल, निखिल दामले, वैभव चव्हाण, संग्राम चौगुले, पुरुषोत्तम दादा पाटील, योगिता चव्हाण, घनश्याम दरडे यांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Collar Blouse Designs : स्टाइल में रहने का...; कॉलर ब्लाउजच्या 5 सुंदर पॅटर्न्स, साडीला येईल मॉडर्न लूक

Maharashtra Live News Update : दिवाळीला आपल्या घरची लक्ष्मी कमळावर होती, त्यामुळे जालन्याच्या विकासाची लक्ष्मी सुद्धा ही कमळावर येणार आहे- चंदशेखर बावनकुळे

अजित पवारांच्या 6 बैठकांना दांडी; शहांच्या भेटीनंतर धनंजय मुंडे अन् CM फडणवीस एकाच व्यासपीठावर, चर्चांना उधाण

Contrast Colour Matching saree: कोणत्या रंगावर कोणता रंग सर्वात जास्त उठून दिसेल? सध्या 'या' 5 रंगांच्या जोड्या आहेत ट्रेडिंगमध्ये

Snehalata Vasaikar: गिरिजा ओकनंतर ही अभिनेत्री होतेय व्हायरल, सौंदर्याने केलं मार्केट जाम

SCROLL FOR NEXT