'Bigg Boss Marathi'च्या 6 व्या सीझनची घोषणा! रितेश देशमुख की महेश मांजरेकर कोण करणार होस्टिंग? 'या' नावाची तुफान चर्चा

Bigg Boss Marathi 6 Announcement : प्रेक्षकांच्या आवडता शो 'बिग बॉस मराठी' चा नवा सीझन लवकरच पाहायला मिळणार आहे. नव्या सीझनची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
Bigg Boss Marathi 6 Announcement
Bigg Boss MarathiSAAM TV
Published On
Summary

मराठी बिग बॉसचा नवीन सीझन लवकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'बिग बॉस मराठी 6' ची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

'बिग बॉस मराठी 5' चे होस्टिंग रितेश देशमुख याने केले होते.

'कलर्स मराठी' वाहिनीने काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ शेअर करून 'बिग बॉस मराठी' चा नवी सीझन येणार असल्याची हिंट दिली होती. मात्र आता 'कलर्स मराठी'ने 'बिग बॉस मराठी 6' येणार असल्याची अधिकृत घोषणा केली आहे. सध्या हिंदी 'बिग बॉस 19' शेवटच्या टप्प्यावर आले आहे. डिसेंबरमध्ये शो चा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. त्यामुळे बिग बॉसच्या चाहत्यांना एका मागोमाग मनोरंजनाची मेजवानी पाहायला मिळणार आहे.

'कलर्स मराठी' वाहिनीने नुकतीच बिग बॉसच्या नवीन सीझनची घोषणा केली आहे. याचा एक खास व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्याला खूप हटके कॅप्शन देण्यात आले आहे. लिहिलं की, "स्वागतासाठी व्हा तयार, कारण लवकरच उघडणार आहे मनोरंजनाचे दार! बिग बॉस मराठी सीझन 6 लवकरच, फक्त कलर्स मराठीवर!" यामुळे बिग बॉसचे चाहेत खूप खुश पाहायला मिळत आहे. सध्या सर्वत्र बिग बॉसचा होस्ट आणि स्पर्धक कोण असणार याची चर्चा पाहायला मिळत आहे.

होस्ट कोण?

आतापर्यंत 'बिग बॉस मराठी' पाच सीझन पार पडले आहेत. पहिले चार सीझन महेश मांजरेकर यांनी होस्ट केले. तर पाचवा सीझन बॉलिवूड, मराठी अभिनेता रितेश देशमुखने होस्ट केला. हा सीझन खूप गाजला. 'भाऊचा धक्का' पाहण्यासाठी प्रेक्षक कायम उत्सुक असायचे. तर महेश मांजरेकर यांच्या वेळी 'बिग बॉस चावडी' चांगलीच रंगायची. त्यामुळे हा नवा सीझन कोण होस्ट करणार याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. यात रितेश देशमुखच्या नावाची तुफान चर्चा पाहायला मिळत आहे. नेटकऱ्यांना रितेश देशमुखच होस्ट म्हणून हवा असल्याचे दिसून येते.

'बिग बॉस मराठी 6' रिलीज डेट, वेळ, स्पर्धकांची नावे, होस्टचे नाव आणि थीम कोणतीही गोष्टी अधिकृतपणे स्पष्ट झाली नाही. त्यामुळे प्रेक्षक हे सर्व जाणून घेण्यासाठी खूपच उत्सुक आहे. नव्या सीझनमध्ये कोणते नवा राड होणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. 'बिग बॉस मराठी 6' आपल्याला कलर्स मराठीवर आणि JioHotstar वर पाहता येईल.

Bigg Boss Marathi 6 Announcement
Prajakta Gaikwad Wedding : मुहूर्त ठरला! प्राजक्ता गायकवाड 'या' दिवशी अडकणार लग्नबंधनात, शाही विवाह सोहळ्याची पत्रिका पाहा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com