Prajakta Gaikwad Wedding : मुहूर्त ठरला! प्राजक्ता गायकवाड 'या' दिवशी अडकणार लग्नबंधनात, शाही विवाह सोहळ्याची पत्रिका पाहा

Prajakta Gaikwad Wedding Date : मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. तिच्या लग्नाची तारीख समोर आली आहे. खास लग्नाची पत्रिका पाहा.
Prajakta Gaikwad Wedding Date
Prajakta Gaikwad Weddingsaam tv
Published On
Summary

मराठी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड लवकरच लग्न बंधानात अडकणार आहे.

प्राजक्ताच्या लग्नाची पत्रिका समोर आली आहे.

प्राजक्ताने ऑगस्ट महिन्यात साखरपुडा करून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली.

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड (Prajakta Gaikwad) लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. तिच्या लग्न सोहळ्याची शाही पत्रिका समोर आली आहे. 7 ऑगस्ट 2025ला साखरपुडा करून प्राजक्ताने चाहत्यांना आपल्या नात्यांची आनंदाची बातमी दिली होती. प्राजक्ता गायकवाडच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव शंभूराज खुटवड असे आहे. दोघे एकत्र खूपच छान दिसतात. चाहते आता त्यांच्या लग्नाची वाट पाहत आहेत.

अलिकडेच काही दिवसांपूर्वी प्राजक्ताने सोशल मीडियावर लग्नपत्रिका पूजनचा व्हिडीओ टाकला होता. तसेच आता तिच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नुकतीच अभिनेत्रीचे केळवण देखील पार पडले आहे. 'स्वराज्यरक्षक संभाजी' या मराठी ऐतिहासिक मालिकेतून प्राजक्ता गायकवाड प्रेक्षकांच्या घराघरात पोहचली. अभिनयासोबतच ती समाज कार्यातही पुढे आहे. 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत प्राजक्ता गायकवाडने महाराणी येसूबाई यांची भूमिका साकारली होती.

लग्नाची तारीख काय?

प्राजक्ता गायकवाड आणि शंभूराज खुटवड 2 डिसेंबर 2025 ला लग्न बंधनात अडकणार आहेत. दुपारी 12.24 हा त्यांच्या लग्नाचा शुभ मुहूर्त आहे. त्यांचा शाही विवाह सोहळा पुण्यात खराडी येथे पार पडणार आहे. तर 1 डिसेंबरला हळदी आणि संगीत सोहळा पार पडणार आहे.

होणारा नवरा कोण?

प्राजक्ता गायकवाडचा होणारा नवरा शंभूराज खुटवड एक उद्योगपती आहे. तसेच पैलवान देखील आहेत. खुटवड कुटुंब राजकारणात सक्रिय आहे. मीडिया रिपोर्टनुसार, शंभूराज खुटवड हा पुण्याच्या फुरसुंगी येथे राहणारा आहे.

Prajakta Gaikwad Wedding Date
Sachin Pilgaonkar On Dharmendra: 'यमला पगला दीवाना' हे शीर्षक माझं, धरमजींचा फोन आला अन्...'; सचिन पिळगांवकरांचा किस्सा चर्चेत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com