ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड ही 'स्वराज्यरक्षक संभाजी' या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहचली. प्राजक्ताने साकारलेल्या महाराणी येसूबाईच्या भूमिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली.
प्राजक्ताने काही दिवसांपूर्वीच ७ ऑगस्ट २०२५ रोजी साखरपुडा करणार असल्याची माहिती सोशल मीडियाद्वारे दिली होती.
अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचा नवरा कोण? त्याच नाव काय, हे जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांच्या मनात निर्माण झाली होती. परंतु,आता या सोहळ्याचे खास फोटो समोर आले आहेत.
प्राजक्ताच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव शंभुराज असे आहे. प्राजक्ता आणि शंभुराज या दोघांचेही व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. संपूर्ण मनोरंजन सृष्टीतून दोघांवर शुभेच्छांचा वर्षावर करण्यात येत आहे.
स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेत प्राजक्ताने छत्रपती संभाजी महाराज यांची पत्नी महाराणी येसूबाई यांची भूमिका साकारली होती. खऱ्या आयुष्यातही पतीचे नाव शंभुराज असल्याने चाहत्यांना हा योगायोग प्रचंड आवडला आहे.
साखरपुड्यासाठी प्राजक्ताने खास ऑफ व्हाईट रंगाची डिझाईनर साडी नेसली होती, यावर लाल रंगाचा शेला नेसला होता. तिच्या ब्लाऊजवर शंभुराज असे लिहून नक्षीकाम केले होते. प्राजक्ताचा हा रॉयल लूक चाहत्यांना आवडला.
प्राजक्ताने आतापर्यंत, आई माझी काळुबाई, संत तुकाराम, नांदा सौख्य भरे आणि स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेत काम केले आहे.