ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लग्नानंतर अनेक नाती बदलतात. त्यातच सासू-सासऱ्यांशी चांगले संबंध नसतील तर घरात कधीही आनंद राहणार नाही.
लग्नानंतर, काही गोष्टी अशा आहेत ज्या रागाच्या भरातही सासूला कधीच बोलू नये, जाणून घ्या.
सासूला रागाच्या भरातही कधी बोलू नका की तुम्ही तुमच्या मुलाला काय शिकवले आहे.
कधीही तुमच्या पतीच्या चुका तुमच्या सासूवर लादू नका.
तुमच्या आणि नवऱ्यातील भांडणाबद्दल सासूला बोलू नका की हे सर्व तुमच्यामुळे घडते किंवा भांडणासाठी तुम्ही जबाबदार आहात.
चुकूनही सासूला उलट उत्तर किंवा मोठ्या आवाजात बोलू नका.
सासूला कधीही असे बोलू नका की, मी तुमच्या मुलाला तुमच्यापेक्षा जास्त चांगले ओळखते.