ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पोटात ॲसिडचे प्रमाण जास्त झाल्याने छातीत जळजळ होणे, अपचन आणि बद्धकोष्ठता सारख्या समस्या उद्भवतात.
हायपरॲसिडिटीवर आराम मिळवण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय ट्राय करु शकता.
आल्याची चहा प्यायल्याने पचनसंस्था मजबूत होते. तसेच अॅसिडिटीचा त्रास कमी होण्यास मदत होते.
जीऱ्याचे पाणी किंवा जीरे पावडरचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते, आणि गॅस आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.
ॲसिडिटीचा त्रास असल्यास दहीचे नियमित सेवन करा. दहीमध्ये प्रोबायोटिक्स असतात जे पोट थंड ठेवण्यास मदत करतात.
पुदिन्याची पाने खाल्ल्याने पोटातील जळजळ आणि अपचनाचा त्रास दूर होतो.
दिवसभरातून दोन ते तीन ग्लास गरम पाणी प्या. यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते.