Prajakta Gaikwad: 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीचं लग्न 'ठरलं', 'ते' फोटो पाहताच नेटकऱ्यांनी विचारलं, होणारा नवरा कोण?

Actress Prajakta Gaikwad Marriage News: मराठी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिने सोशल मीडियावर लग्न ठरल्याची आनंदाची बातमी शेअर केली आहे. तिच्या पारंपारिक लूकमधील फोटोवर चाहत्यांकडून आणि सेलिब्रिटींकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Actress Prajakta Gaikwad
Actress Prajakta Gaikwad Saam Tv
Published On

'स्वराज रक्षक संभाजी' या मालिकेतील अभिनेत्री म्हणजेच प्राजक्ता गायकवाड. मराठी मनोरंजनविश्वात प्राजक्ता गायकवाडने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची थाप मिळवली आहे. वैयक्तिक आयुष्यामुळे देखील प्राजक्ता गायकवाड सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात असते. नुकतेच अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. जी सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

Actress Prajakta Gaikwad
Marathi Movie: 'पालतू फालतू' मध्ये दिसणार सुबोध-रिंकूची मिश्किल झलक; 'बेटर-हाफची लव्हस्टोरी' चित्रपटातील पहिलं गाणं प्रदर्शित

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने सोशल मिडिया इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. पारंपारिक अंदाजात अभिनेत्रीने तिचे साडीतील खास फोटो शेअर केले आहेत. गळ्यात हार, कपाळी टिळा, हातावर मेहंदी असा प्राजक्ताचा लक्षवेधी लूक आहे. फोटो शेअर करत प्राजक्ताने 'प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा' ठरलं असा हॅशटॅग तिने कॅप्शनला दिला आहे.

दुसऱ्या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता, प्राजक्ता खूपच आनंदी दिसत आहे. मराठमोळा लूक तिने केला आहे. संपूर्ण परिवारासह प्राजक्ताचा लग्न ठरल्याचा कार्यक्रम पार पडला आहे. तिने अनेक फोटो शेअर केले आहेत. सोशल मीडियावरील प्राजक्ताच्या फोटोवर नेटकऱ्यांकडून लाईक्स आणि प्रतिक्रिया देखील येत आहेत. सेलिब्रिटीसह अनेक चाहत्यांनी प्राजक्ताच्या फोटोवर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. बिग बॉस फेम कोकण हार्टेड गर्लने अभिनंदन पोरी अशी प्रतिक्रिया दिली आहे.

प्राजक्ताचा होणारा नवरा कोण आहे?

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचा होणारा नवरा कोण आहे हे अद्याप कोणालाही माहित नाही. अभिनेत्रीने देखील याबाबत अद्यापही खुलासा केलेला नाही. सोशल मीडियावर फोटोंना देखील चाहते 'तुझा होणारा नवरा कोण?' असं विचारत आहे. यामुळे अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचा होणारा नवरा कोण असेल याबाबतची उत्सुकता लागली आहे.

Actress Prajakta Gaikwad
Nora Fatehi-Shreya Ghoshal : मेलोडी क्वीन श्रेया घोषाल अन् दिलबर गर्ल नोरा फतेही एकत्र, क्रॉस-कल्चरल व्होकल कोलॅबोरेशनची चर्चा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com