Sachin Pilgaonkar On Dharmendra: 'यमला पगला दीवाना' हे शीर्षक माझं, धरमजींचा फोन आला अन्...'; सचिन पिळगांवकरांचा किस्सा चर्चेत

Sachin Pilgaonkar: सचिन पिळगांवकर यांनी धर्मेंद्र यांचा चित्रपट 'यमला पगला दीवाना'च्या नावाचा किस्सा सांगितला आहे. तसेच त्यांच्या सोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला आहे.
Sachin Pilgaonkar
Sachin Pilgaonkar On Dharmendra SAAM TV
Published On
Summary

89 वर्षी बॉलिवूडचे 'ही-मॅन' धर्मेंद्र यांचे निधन झाले.

अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी धर्मेंद्र यांच्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

सचिन पिळगांवकर यांनी 'यमला पगला दीवाना'या चित्रपटाच्या नावाचा किस्सा सांगितला आहे.

मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे. वयाच्या 89 वर्षी दिग्गज अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra ) यांचे निधन झाले आहे. त्यांनी 24 नोव्हेंबर 2025ला अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक होती. धर्मेंद्र याची अभिनयातील कारकीर्द खूप मोठी आहे. त्यांनी आयुष्यात खूप लोक जोडली आहेत. धर्मेंद्र हे एक आदर्श व्यक्तिमत्व होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट केले आहेत.

धर्मेंद्र यांच्या निधनानंतर मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहली. त्यांच्यासोबतच्या आठवणी शेअर केल्या. मराठी अभिनेते सचिन पिळगांवकर (Sachin Pilgaonkar) यांनी देखील धर्मेंद्र यांच्यासोबत चित्रपटात काम केले आहे. त्यांनी देखील पोस्ट करून धर्मेंद्र यांच्या आठवणींना उजाळा दिला. धर्मेंद्र यांना बॉलिवूडचा 'ही-मॅन' म्हणून ओळखले जायचे.

सचिन पिळगांवकर यांनी ईटाइम्सला दिलेल्या प्रतिक्रियेत सांगितले की, धर्मेंद्रजी हे नम्र व्यक्तिमत्व होते. मी नऊ वर्षांचा असताना त्यांच्यासोबत पहिल्यांदा काम केले. 1967 मध्ये रिलीज झालेल्या 'मझली दीदी' चित्रपटात मी मीना कुमारीजींच्या धाकट्या भावाची भूमिका केली होती. तर मीना कुमारी यांनी धर्मेंद्रजींच्या पत्नीची भूमिका केली. ते सेटवर प्रत्येकाशी आदराने बोलायचे. रेशम की डोरी या चित्रपटात मी धर्मेंद्रजी यांच्या तारुण्यातील भूमिका साकारली होती. आम्ही 'शोले', 'दिल का हीरा', 'क्रोधी' या चित्रपटांमध्ये आम्ही एकत्र काम केले. आमची चांगली मैत्री झाली. 'आजमाइश' या चित्रपटात मला त्यांना दिग्दर्शित करण्याचे भाग्य लाभले. "

पुढे सचिन पिळगांवकर म्हणाले की, "मी इंडियन मोशन पिक्चर प्रोड्यूसर्स असोसिएशनकडे 'यमला पगला दिवाना' हे चित्रपटाचे शीर्षक पाठवले होते. मला एका निर्मात्याने शीर्षक देण्यासाठी फोन केला. मात्र मी नकार दिला. त्यानंतर धर्मेंद्रजींनी मला फोन केला. मी त्यांना विचारले, 'कसे आहात धर्मेंद्रजी?' त्यानंतर ते म्हणाले, सचिन तुमच्याकडे 'यमला पगला दिवाना' हे चित्रपटाचे शीर्षक आहे? त्यावर मी नाही बोलो. तेव्हा धर्मेंद्रजी म्हणाले, मला निर्मात्यानी सांगितले की, तुम्ही त्यांना नकार दिला. तेव्हा मी त्यांना म्हणालो, 'ते शीर्षक फक्त तोपर्यंत माझे होते, जोपर्यंत तुम्ही ते मागितले नव्हते. आता ते माझे राहीले नाही, ते तुमचे आहे."

Sachin Pilgaonkar
Dharmendra : पंजाब का मुंडा कसा बनला बॉलिवूडचा 'ही-मॅन'? धर्मेंद्र यांचा संघर्षमय प्रवास

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com