Suraj Chavan - jahnavi killekar Haldi Dance Video
Suraj Chavan Haldi VideoSAAM TV

Suraj Chavan Haldi Video : हळद लागली! सूरज चव्हाणच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात, जान्हवी किल्लेकर 'झापुक झुपूक'वर तुफान नाचली

Suraj Chavan - jahnavi killekar Haldi Dance Video : 'बिग बॉस मराठी 5'चा विजेता लवकरच बोहल्यावर चढणार आहे. सूरज चव्हाणच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली आहे. सूरजच्या हळदी समारंभात जान्हवी किल्लेकर बेभान होऊन नाचली.
Published on
Summary

सूरज चव्हाणचा हळदी समारंभ पार पडला आहे.

हळदीत सूरज आणि जान्हवी किल्लेकर बेभान होऊन नाचले आहेत.

सूरज आणि जान्हवीने 'झापुक झुपूक' गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे.

'बिग बॉस मराठी 5'चा विजेता सूरज चव्हाण आज (29 नोव्हेंबर 2025) लग्न बंधनात अडकणार आहे. सूरज मामाची मुलीसोबत लग्न करतोय. सूरज चव्हाणच्या होणाऱ्या बायकोचे नाव संजना आहे. सूरज चव्हाणच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली आहे. काल थाटामाटात सूरज चव्हाण आणि संजनाचा हळद आणि मेहंदी सोहळा पार पडला आहे. मेहंदी आणि हळद सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडिया तुफान व्हायरल होत आहेत.

सूरज चव्हाणच्या नवीन घरात हळदीचा आणि मेहंदीचा कार्यक्रम पार पडला आहे. सूरज चव्हाण आणि संजनाने हातावर सुंदर मेहंदी काढली आहे. तर दोघेही हळदीमध्ये माखले आहेत. संजनाच्या हातावर सूरजचे नाव लिहिलं आहे. सूरज चव्हाणचे नवीन घर लग्नासाठी सजवण्यात आले आहे. सूरजच्या हळदी कार्यक्रमात मराठी अभिनेत्री आणि बिग बॉस मराठीची सदस्य जान्हवी किल्लेकरने उपस्थिती लावली.

जान्हवी किल्लेकर आणि सूरज चव्हाणने 'झापुक झुपूक' या गाण्यावर हळदीत भन्नाट डान्स केला आहे. जान्हवी सूरजला भाऊ मानते. तिने सूरजला त्याच्या चित्रपटासाठी देखील खूप पाठिंबा दिला होता. सूरज चव्हाणचे थाटात लग्न सोहळा पार पडत आहे. त्याचे चाहते खूपच खुश पाहायला मिळत आहेत. अलिकडेच सूरज चव्हाणचे प्री-वेडिंग शूट करण्यात आले होते. तर अंकिता वालावालकरने सूरज आणि संजनाचे थाटात केळवण देखील केले होते

सूरज चव्हाण 29 नोव्हेंबर 2025 थाटामाटात लग्न करणार आहे. संध्याकाळी 6.11 चा लग्नाचा मुहूर्त ठरवण्यात आला आहे. सूरज चव्हाणचे लग्न माऊली गार्डन हॉलवर होणार आहे. हे ठिकाण सासवड-जेजुरी रोड, पुरंदर तालुक्यात , पुणे जिल्ह्यात आहे. सूरजला लग्नासाठी चाहते, कलाकार मंडळी शुभेच्छा देताना दिसत आहे.

Suraj Chavan - jahnavi killekar Haldi Dance Video
Smriti - Palash : स्मृती मानधना अन् पलाश मुच्छलनं इन्स्टाग्राम प्रोफाइलचा Bio बदलला, चाहते पडले गोंधळात

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com