Big Boss Marathi 5 canva
मनोरंजन बातम्या

Big Boss Marathi 5: आरडाओरड, शर्ट फाडलं, ओढाओढी, धक्काबुक्की, बिग बॉसच्या घरात पुन्हा राडा, 'गुलिगत' सूरजचा आक्रमक अवतार

Big Boss New Promo : बिग बॉसच्या घरात कॅप्टनसी पदाच्या टास्क खेळला जाणार आहे. प्रदर्शित झालेल्या नव्या प्रोमोमध्ये सूरज अक्रमक आरडाओरड करताना दिसतोय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या आठवड्याला सुरुवात झाली आहे. बिग बॉस मराठीच्या पहिल्या दिवसापासूनच घरामध्ये राडे आणि अनेक मतभेद पाहायला मिळत आहेत. घरामधील कामं असो किवां टास्क सर्व सदस्य अगदी मनापासून खेळताना दिसतायेत. आठवड्याच्या शेवटी सर्व सदस्यांची शाळा भाऊच्या धक्क्यावर घेतली जाते. टास्क आणि सदस्यांच्या राहणीमानाच्या आधावर रितेश देशमुख त्यांच्याशी संवाद साधताना दिसतो.

मागील आठवड्यामध्ये निकी आणि जान्हवी यांच्यामध्ये मैत्रीला तडा जाईल असं वक्तव्य जान्हवीनं केलं होतं आणि भाऊच्या धक्क्यावर ते प्रेक्षकांच्या समोर देखील अलं आहे. कालच्या भागामध्ये जान्हवीने निकीची माफी मागितली. परंतु, निकीनं तिच्याशी बोलायचं नाही असं स्पष्टच सांगितलं. त्यानंतर बिग बॉसने सर्व सदस्यांची संवाद सादला. त्यांनी पुढारी, अभिजित आणि निखिल यांच्या आळशीपणामुळे त्यांची खिल्ली देखील उडवली तर, अंकिता हिच्याशी कोकणी भाषेत संवाद देखील साधला.

त्यानंतर वैभव आणि इरिना एकत्र बसलेले असताना बिग बॉसने सर्व सदस्यांना हॉलमध्ये जमण्यास सांगितले. सर्वाना फास्ट पूड खाण्याची इच्छा होत असल्यास कॅप्टन पदाच्या उमेदवारांना त्यांनी फास्ट फूड पाठवल्याचे सांगितले.

बिग बॉस कॅप्टन पदाच्या उमेदवारांना एक नवा टास्क दिला आहे. त्यामध्ये ज्या सदस्याकडे सर्वात जास्त फ्रेंच फ्राईज असतील तो उमेदवार कॅप्टन पदासाठी पुढे खेळणार असं सांगण्यात आलं. सोशल मीडियावरील व्हायरल झालेल्या नव्या प्रोमोमद्ये सर्वांचा लाडका गोलिगत म्हणजेच सूरज आक्रमक भूमिकेत दिसणार आहे. टास्क होण्यापूर्वी तो कॅप्टन होण्यास इच्छूक असल्याचे त्याने सांगितल होते. टास्क दरम्यान सद्स्यांमध्ये आरडाओरड, ओढाओढी आणि धक्काबुक्की पाहायला मिळत्ये. त्यासोबतच सूरजनं त्याचं शर्ट फाडल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यादरम्यान सूरजने अरबाजला धमकी देखील दिली आहे. आता कॅप्टनसी टास्कमध्ये सर्व सदस्यांची काय स्ट्रॅटर्जी असमार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.

Edited By: Nirmiti Rasal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Crime News: १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना; ५ वर्षाच्या मुलाला संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

Maharashtra Politics : भाजप मंत्र्यांकडून ऑपरेशन लोटस; बडा नेता कमळ हाती घेणार?

SCROLL FOR NEXT