How to Stop Eating Fast Food : फास्ट फूड खाण्याची इच्छा कशी कमी करावी ? संशोधकांना सापडला रामबाण उपाय

युवा पिढीच्या या सम्यसेने आरोग्य क्षेत्रातील तज्ञ्जांच्याही चिंता वाढविली आहे. युवा पिढीच्या या समस्येच्या अभ्यास एका तज्ञ्जांनी केला आहे. या अभ्यासात आढळून आले की, युवा पिढीवर 'फूड चॅलेंज' आणि 'कुकिंग व्हिडीओ'चा प्रभाव दिसून आला आहे
How to Avoid Fast Food
How to Avoid Fast Foodsaam tv
Published On

मुंबई : कॉलेज आणि कामानिमित्त घरापासून दूर राहणारे युवक नेहमी जेवणासाठी कित्येकदा फास्ट फूड (Fast Food) खाणे पसंत करतात. फास्ट फूड खाण्याच्या सवयीमुळे युवक हे लठ्ठपणा आणि अन्य आजारांना बळी पडतात. युवा पिढीच्या या सम्यसेने आरोग्य क्षेत्रातील तज्ञ्जांच्याही चिंता वाढविली आहे. युवा पिढीच्या या समस्येच्या अभ्यास एका तज्ञ्जांनी केला आहे. या अभ्यासात आढळून आले की, युवा पिढीवर 'फूड चॅलेंज' आणि 'कुकिंग व्हिडीओ'चा प्रभाव दिसून आला आहे. याच्या माध्यमातूनच युवा विद्यार्थी जेवणात फळ आणि पालेभाज्यांचा सामावेश करतात. युवा विद्यार्थी कुकिंग व्हिडीओ पाहूनच फळ आणि भाज्यांचे महत्व समजून घेत आहेत. (How to Avoid Fast Food)

How to Avoid Fast Food
Eyes Pain : तुमचे डोळे सतत दुखतात का ? जाणून घ्या कारण

आरोग्य क्षेत्रातील तज्ञ्जांनी अभ्यास करून या अभ्यासाचा निष्कर्ष 'जर्नल आफ न्यूट्रीशियन अँड बिहेविअर' यामध्ये प्रकाशित केला आहे. या अभ्यासातून अनेक महत्वाचे निष्कर्ष समोर आले आहेत. कॉलेजमध्ये जाणारे विद्यार्थी हे भारतातील लोकसंख्येचा मोठा हिस्सा आहे. बहुतेक विद्यार्थ्यांच्या आहारामध्ये दुग्धजन्य पदार्थ, धान्य, फळे आणि हिरवे पालेभाज्यांचा सामावेश कमी प्रमाणात दिसून आला आहे.

'युएसए' स्थित एका विद्यापीठाच्या आरोग्य व क्रीडा विभागाचा संशोधनकर्ता कैरोल ओ-निल यांच्या अभ्यासानुसार आरोग्यदायी अन्नापासून विद्यार्थी दूर होण्याला प्रमुख कारणे आहेत. त्यामध्ये आहार विषयक ज्ञानाची कमरता, निरोगी अन्नाला पर्याय आणि विद्यार्थ्यांकडे वेळेची कमतरता या कारणाचा सामावेश आहे. तसेत कॉलेजमध्ये पोषण कार्यक्रमाचा उद्देश हा ज्ञानप्राप्ती आणि पोषण मूल्यमापन कौशल्ये शिकणे असतो. जीवनवशैलीमध्ये बदल झाल्याने विद्यार्थी हे चांगल्या आहारासाठी पर्याय निवडत आहेत.

How to Avoid Fast Food
Moong Dal Khichdi Recipe: पावसाळ्यात मूग डाळ खिचडी खा, त्याचे फायदे आणि रेसिपी जाणून घ्या

विद्यार्थ्यांमध्ये आहाराविषयी जागरूकता निर्माण होण्यासाठी कार्यक्रमाचे नियोजन

दरम्यान, विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या आहाराविषयी आवड निर्माण व्हावी, यासाठी पोषण विषयक अभ्यासक्रमाला अनुसरून एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या आहाराविषयक पंधरवड्यात 'फूड चॅलेंज' आणि जेवण बनवण्याऱ्या व्हिडीओंचा सामावेश करून कार्यक्रम तयार करण्यात आला. या कार्यक्रमात जेवण तयार करण्याविषयी आणि आहाराच्या गुणवत्तेबद्दल माहिती देण्यात आली.तसेच विद्यार्थांना आहारात दुग्धजन्य पदार्थ, धान्य, फळे आणि हिरवे पालेभाज्यांचा सामावेश करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com