Moong Dal Khichdi Recipe: पावसाळ्यात मूग डाळ खिचडी खा, त्याचे फायदे आणि रेसिपी जाणून घ्या

चला तर जाणून घेऊया कमी मसाल्यात चविष्ट खिचडी कशी तयार करायची.
Moong Dal Khichdi
Moong Dal KhichdiSaam Tv

Moong Dal Khichdi Recipe: जेव्हा तुम्हाला काहीतरी हलकं खावंसं वाटतं, तेव्हा सर्वात पहिली गोष्ट मनात येते ती म्हणजे खिचडी. हेल्दी आणि चविष्ट असण्यासोबतच खिचडी झटपट तयार होते. खिचडी अगदी सहज पचते. डॉक्टर अनेकदा पोटदुखी असलेल्या रुग्णांना खिचडी खाण्याचा सल्ला देतात. चला तर जाणून घेऊया कमी मसाल्यात चविष्ट खिचडी कशी तयार करायची.

हे देखील पाहा -

मूग डाळ खिचडीसाठी लागणारे साहित्य

१ कप तांदूळ

२ कप मूग डाळ

तेल

1 छोटा कांदा

1 टीस्पून जिरे

३-५ लवंगा

1/4 टीस्पून गरम मसाला

चवीनुसार मीठ

Moong Dal Khichdi
सर्वसामान्य गुंतवणूकदारांचा मार्गदर्शक हरपला; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं दु:ख

रेसिपी जाणून घ्या

प्रथम डाळ आणि तांदूळ स्वतःच पाण्याने धुवून घ्या.

मध्यम आचेवर प्रेशर कुकरमध्ये तेल टाका

नंतर त्यात कांदा हलका ब्राऊन परतून घ्या त्यानंतर त्यात जिरे टाका

मसूर, तांदूळ, मीठ, गरम मसाला आणि ४-६ वाट्या पाणी घालून २ शिट्ट्या झाल्यावर गॅस बंद करा.

मूग डाळ खिचडी तयार आहे, दही, चटणी बरोबर सर्व्ह करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com