Chhatrapati Sambhajinagar: संभाजीनगर हादरलं! बटण गोळ्यांच्या नशेत तरूणाचा खून; हातात चाकू, आरडाओरड करत आरोपीचा भररस्त्यात धिंगाणा

Youth Killed In Button Pill Intoxicated: छत्रपती संभाजीनगरमध्ये एका तरूणाचा चाकू भोसकून खून केल्याची घटना घडली आहे. आरोपी बटण गोळ्याच्या नशेत असल्याची माहिती मिळत आहे.
तरूणाचा खून
Youth Killed Saam Tv

माधव सावरगावे, साम टीव्ही छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगरमध्ये बटण गोळ्याची नशा केलेल्या एका तरुणाने धारदार चाकूने एकाचा खून केल्याची घटना घडली आहे. शहरातील नारेगाव परिसरात ही घटना घडली आहे. नशेच्या गोळ्या खाऊन देहभान विसरणारे तरुण रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. वर्षभरात अशा नशेखोरांकडून खुनाच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये नागरिकांत भीतीचं वातावरण दिसत आहे.

खून झालेल्या तरूणाचं नाव फिरोज खान कलीम खान असं आहे, तर आरोपीचं नाव कलीम शहा असं आहे. कलीम शहा बटण गोळ्याची नशा करत असल्याचं समोर आलं आहे. त्याने नशेमध्ये फिरोजची हत्या (Youth Killed) केली आहे. त्यानंतर कलीम हातात चाकू घेऊन खुलेआम रस्त्यावर फिरत होता. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला होता.

ही घटना काल (४ जून) शहरातील (Chhatrapati Sambhajinagar) नारेगाव परिसरात घडल्याचं समोर आलंय. याप्रकरणी मृत फिरोज खानच्या भावाने पोलिसांत तक्रार दिली आहे. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास असराटी हाऊस हॉटेल येथे ही घटना घडली आहे. कलीम शहा फिरोजला या हॉटेलमध्ये भेटला होता. तो नशेत होता. फिरोजकडे दारू पिण्यासाठी पैसे मागत होता, परंतु त्याला फिरोजने पैसे देण्यास नकार (Crime News) दिला.

तरूणाचा खून
Mumbai Crime News: पाणीकपात महिलेच्या जीवावर बेतली; पतीचा पत्नीवर जीवघेणा हल्ला, मुंबईतील खळबळजनक घटना

त्यामुळे संतापलेल्या कलीमने फिरोजवर चाकूहल्ला केला. त्याने चाकूने वार केले. या हल्ल्यात मृतक गंभीर जखमी होता. त्याला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु रूग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी काही वेळानंतर फिरोजला मृत घोषित केलं. आरोपीच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल झाली आहे. सध्या राज्यात अमली पदार्थांच्या नशेतून (Button Pill Intoxicated) गुन्हेगारीच्या घटना जास्त घडल्याचं पाहायला मिळत आहे.

तरूणाचा खून
Ulhasnagar Crime : उल्हासनगरमध्ये भाजपा कार्यकर्ताला शिंदे गटाकडून बेदम मारहाण; विकास कामाच्या श्रेय वादातून भांडण

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com