Ulhasnagar Crime : उल्हासनगरमध्ये भाजपा कार्यकर्ताला शिंदे गटाकडून बेदम मारहाण; विकास कामाच्या श्रेय वादातून भांडण

Ulhasnagar News : उल्हासनगर येथील मराठा सेक्शन भागात स्थानिक नगरसेवक मिताली सोनू चांनपुर यांच्या प्रयत्नाने एक विकास काम सुरू आहे.
Ulhasnagar Crime
Ulhasnagar CrimeSaam tv

अजय दुधाने 

उल्हासनगर : विकास कामाच्या श्रेयवादातून निर्माण झालेल्या वादातून जोरदार भांडण झाले. या वादात भाजपच्या कार्यकर्त्याला शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार उल्हासनगर मध्ये घडला आहे. मारामारीचे ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. 

Ulhasnagar Crime
Nandurbar Accident : डंपरने दोन मोटारसायकलींना उडविले; नवापूर भाजप तालुका उपाध्यक्षासह एकाचा मृत्यू

उल्हासनगर (Ulhasnagar) येथील मराठा सेक्शन भागात स्थानिक नगरसेवक मिताली सोनू चांनपुर यांच्या प्रयत्नाने एक विकास काम सुरू आहे. या कामाचे श्रेय घेण्यासाठी स्थानिक भाजपा (BJP) कार्यकर्ता सुनील तांबेकर आणि त्यांचे बंधू संतोष तांबेकर या विकास कामाकडे येऊन उभे राहत होते. मात्र तांबेकर यांचा या विकास कामाशी कोणताही संबंध नसल्याने फक्त तांबेकर विकास कामामध्ये श्रेय घेत आहेत; हे पाहून चानपूर यांच्याकडे काम करत असलेले निलेश सरोजा यांनी संतोष तांबेकर यांना विचारले असता दोघांमध्ये वाद झाला. 

Ulhasnagar Crime
Dombivali Crime : डोंबिवलीतील हत्येचा उलगडा; सुपारी दिल्याच्या संशयातून ब्रोकरला संपविले, एका संशयितास घेतले ताब्यात

मारहाण करणाऱ्याला पोलिसांनी घेतले ताब्यात 

दरम्यान वादाचे रूपांतर जोरदार भांडणात झाले आणि (Shiv Sena) शिंदे गटाचे माजी युवा पदाधिकारी सोनू चांनपुर यांच्याकडे काम करत असलेल्या निलेश सरोजा यांनी संतोष तांबेकर यांना फ्री स्टाईल बेदम मारहाण केली. घडलेल्या प्रकारानंतर संतोष तांबेकर यांना उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून निलेश सरोजा यांना विठ्ठलवाडी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना १ जूनला सायंकाळ घडली आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com