Nandurbar Accident : डंपरने दोन मोटारसायकलींना उडविले; नवापूर भाजप तालुका उपाध्यक्षासह एकाचा मृत्यू

Nandurbar News : नवापुर तालुक्यातील खांडबारा- नंदुरबार रस्त्यावर खांडबारा ग्रामीण रुग्णालयाचे पुढे दोन मोटरसायकलींच्या भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे.
Nandurbar Accident
Nandurbar AccidentSaam tv

सागर निकवाडे 

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील खांडबारा गावाजवळ दोन मोटरसायकलींचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. अज्ञात वाहनाने धडक दिल्याने हा अपघात घडल्याचे प्राथमिक माहिती समोर आली असून अपघातात भाजप तालुका उपाध्यक्षसह एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा व्यक्ती गंभीर जखमी आहे. 

Nandurbar Accident
Yellow Alert : रत्नागिरी जिल्ह्यात पुढील तीन दिवस यलो अलर्ट; जोरदार पावसाचा इशारा

नवापुर (Navapur) तालुक्यातील खांडबारा- नंदुरबार रस्त्यावर खांडबारा ग्रामीण रुग्णालयाचे पुढे दोन मोटरसायकलींच्या भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. खांडबारा ग्रामीण रुग्णालयाचे पुढे दोन मोटरसायकलला अज्ञात डंपर वाहनाने धडक देऊन घटना स्थळावरून डंपर चालक वाहन फरार झाला होता. घटनास्थळी पोलिसांनी पाहणी केली. तसेच दोन्ही अपघातग्रस्त मोटरसायकल खांडबारा पोलीस दूरक्षेत्र या ठिकाणी जमा करण्यात आले आहेत. 

Nandurbar Accident
Cyber Crime : दुप्पट मोबदल्याची आमिष; तरुणाची पाच लाखात फसवणूक

दोघांचा मृत्यू 

सदर अपघातात (Accident) तीन जण गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर खांडबारा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी नंदुरबार (Nandurbar) जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला होते. मात्र जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान नवापूर तालुका उपाध्यक्ष ऍड. नशीब नथथू गावीत (रा. खडकी, ता. नवापूर) व फत्तेसिंग चंदू गावित (वय ६९, रा. टोकर तलाव, ता. नंदुरबार) यांच्या मृत्यू झाला.  तर अपघातात जखमी झालेले दयानंद पाडवी (वय ३५) यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com