Yellow Alert : रत्नागिरी जिल्ह्यात पुढील तीन दिवस यलो अलर्ट; जोरदार पावसाचा इशारा

Ratnagiri News : यंदा मान्सून लवकर येणार असल्याची शक्यता वर्तविली आहे. दरम्यान केरळमध्ये मान्सूनचे आगमन झाले असल्याने राज्यात देखील मान्सून वेळेअगोदरच दाखल होण्याची शक्यता
Yellow Alert
Yellow AlertSaam tv
Published On

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यासाठी पुढचे तीन दिवस यलो अलर्ट असणार आहे. या तीन दिवसांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याचा असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्याचबरोबर समुद्रामध्ये ताशी ३० ते ४०  किलोमीटर असे वेगाने वारे वाहतील असा इशारा देखील दिला आहे. 

Yellow Alert
Godavari River : गोदावरीवरील तिन्ही बंधारे कोरडे; गोदाकाठावरील नागरिकांनी पाण्यासाठी भटकंती 

यंदा मान्सून (Rain) लवकर येणार असल्याची शक्यता वर्तविली आहे. दरम्यान केरळमध्ये मान्सूनचे आगमन झाले असल्याने राज्यात देखील मान्सून वेळेअगोदरच दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मान्सूनच्या आगमनाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. दरम्यान राज्यात मागील काही दिवसांपासून अवकाळी पाऊस होत आहे. यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. वादळी वाऱ्यासह पाऊस येत असल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर आता पूर्व मौसमी पाऊस (Rain Alert) देखील येत आहे. 

Yellow Alert
Lok Sabha Election : मतमोजणी ठिकाणी तांत्रिक वस्तू आढळल्यास कारवाई; अँड्रॉइड मोबाईल घड्याळ वापरण्यास बंदी

सावधानतेचा इशारा 

दरम्यान (Ratnagiri) रत्नागिरी जिल्ह्याला पुढील तीन दिवस येलो अलर्ट जरी केला असून या तीन दिवसात जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर समुद्रात देखील वेगाने वारे वाहणार असल्याने या काळात नागरिकांनी सावधान राहण्याचा इशारा दिला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com