Bigg Boss 19 SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 19 : नेहलनंतर घराचा नवीन कॅप्टन कोण? अमाल- तान्याच्या मैत्रीत दुरावा, पाहा VIDEO

Bigg Boss 19 New Captain : 'बिग बॉस 19'च्या घरात नुकताच कॅप्टन्सी टास्क पार पडला आहे. नेहलनंतर घराचा नवी कॅप्टन कोण झाला, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'बिग बॉस 19'च्या घरात कॅप्टन्सी टास्क पार पडला आहे.

नेहलनंतर घराचा नवीन कॅप्टन ठरवण्यात आला आहे.

बिग बॉसच्या घरात अमाल आणि तान्यामध्ये मोठे भांडण झाले.

'बिग बॉस 19'च्या (Bigg Boss 19 ) घरात सध्या रोज नवीन राडा होताना पाहायला मिळत आहे. घरातील नात्यांची समि‍करणे बदललेली पाहायला मिळत आहेत. मित्र शत्रू आणि शत्रू मित्र बनताना दिसत आहेत. नुकताच घरात कॅप्टन्सी टास्क पार पडला आहे. तर घरात तान्या मित्तल आणि अमाल मलिकच्या मैत्रीत दुरावा आला आहे. दोघांचे घरात भांडण होते. नेहलनंतर 'बिग बॉस 19'चा नवा कॅप्टन कोण, जाणून घेऊयात.

'बिग बॉस 19'च्या कॅप्टन्सी टास्कमध्ये घरातील सर्व सदस्य असेंब्ली रूमध्ये एकत्र बसलेले पाहायला मिळत आहेत. तेव्हा कॅप्टन्सीसाठी घरातील सदस्य एकमेकांची नावे घेतात. तेव्हा बसीर नेहल आणि अमालचे नाव घेतो. अभिषेक प्रणित आणि अशनूरचे नाव घेतो. नेहल कुनिका आणि बसीरचे नाव घेते. बसीर नेहल आणि अमालचे नाव घेतो. तर गौरवने प्रणित मोरेचे नाव घेतले. अशनूर अभिषेक आणि प्रणितचे नाव घेते.

फरहाना गौरव खन्नाचे नाव घेते. तर अमाल मलिक बसीर आणि मृदुलचे नाव घेतो. असे घरातील सर्व सदस्य कॅप्टन्सीसाठी पात्र असलेल्या स्पर्धकांची नावे घेतात. 'बिग बॉस 19'ची माहिती देणाऱ्या विविध सोशल मिडिया अकाउंटनुसार 'बिग बॉस 19'चा नवा कॅप्टन मृदुल तिवारी झाला आहे.

बिग बॉसच्या घरात सुरुवातीपासून अमाल मलिक आणि तान्या मित्तलचे नाते चर्चेचा विषय बनला आहे. मात्र आता दिवसेंदिवस अमाल मलिक आणि तान्या मित्तलच्या मैत्रीच्या नात्यात दुरावा आलेला पाहायला मिळत आहे. घरात अमाल तान्याशी भांडताना दिसत आहे. या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून कोण बाहेर जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बाळासाहेब जन्मशताब्दीनिमित्त कार्यक्रम

Thane Water Shutdown News: ठाण्यात मोठी पाणीबाणी; तब्बल १२ दिवस पाणी कपात, कोणत्या भागांना बसणार फटका?

लाडक्या बहिणींना दिलासा; ई-केवायसीसाठी पुन्हा मुदतवाढ मिळणार|VIDEO

Men Health: चाळीशीनंतर पुरुषांनी ‘हे’ चार Medical चेकअप आवर्जून करा; दुसरी चाचणी सर्वात महत्त्वाची

भाजपची तामिळनाडूवर नजर; स्टॅलिन सरकारविरोधात PM मोदींनी दंड थोपटले, काय आहे फॉर्म्युला?

SCROLL FOR NEXT