Bigg Boss 19 : गौरव खन्ना विरुद्ध संपूर्ण घर; ४ सदस्यांवर नॉमिनेशनची टांगती तलवार,पाहा VIDEO

Bigg Boss 19 Update : 'बिग बॉस 19'च्या घरात 4 सदस्य नॉमिनेट झाले आहेत. तसेच घरात गौरव खन्ना सदस्यांशी भांडताना दिसत आहे.
Bigg Boss 19 Update
Bigg Boss 19SAAM TV
Published On
Summary

'बिग बॉस 19'च्या घरातील 4 सदस्य नॉमिनेट झाले आहेत.

गौरव खन्नाच्या विरुद्ध संपूर्ण घर पाहायला मिळत आहे.

दिवाळी असल्यामुळे बिग बॉसच्या घरात गेल्या आठवड्यात एलिमिनेशन झाले नाही.

'बिग बॉस 19'च्या घरात रोज एक नवीन ड्रामा पाहायला मिळत आहे. नुकताच घरात 'वीकेंड का वार' पार पडला आहे. दिवाळी असल्यामुळे घरात एलिमिनेशन पार पडले नाही. 'बिग बॉस 19'च्या घरात धुमधडाक्यात दिवाळी साजरी झाली. दिवाळी सेलिब्रेशननंतर नवीन आठवड्यात नॉमिनेट झालेल्या सदस्यांची नाव जाहीर करण्यात आली. तसेच घरात आता पुन्हा वाद सुरू झाला आहे. मात्र यावेळी गौरव खन्ना भांडणाचे कारण बनला आहे.

गौरव खन्ना विरूद्ध संपूर्ण घर

बिग बॉसच्या घरात टास्कमध्ये भांडणे तर होतात. मात्र आता घरातील कामांवरून देखील मोठे वाद व्हायला सुरूवात झाली आहे. आता घरात चमचा धुवण्याच्या ड्युटी वरून वाद झाला आहे. गौरव खन्ना विरूद्ध संपूर्ण घर पाहायला मिळत आहे. घरातील सदस्य गौरव खन्नाला चमचे न धुतल्यामुळे जाब विचारताना दिसत आहेत. कनिका, निलम, बसीर अली, अमाल मलिक, नेहल गौरव खन्नाशी भांडत आहेत.

नॉमिनेट सदस्य

'बिग बॉस 19'च्या घरातून बाहेर जाण्यासाठी या आठवड्यात 4 सदस्य नॉमिनेट झाले आहेत. यात गौरव खन्ना, प्रणित मोरे, नेहल चुडासमा आणि बसीर अली यांचा समावेश आहे. आता येणाऱ्या 'वीकेंड का वार'मध्ये बिग बॉसच्या घरातील कोणता सदस्य बाहेर जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. भांडी धुण्याच्या मुद्द्यावरून गौरव खन्ना बिग बॉसचे घर डोक्यावर घेतले आहे.

रश्मिका मंदान्नाची एन्ट्री

बिग बॉसमध्ये दिवाळी स्पेशल 'वीकेंड का वार'मध्ये रश्मिका मंदान्ना आणि आयुष्मान खुराना आले होते. रश्मिका आणि आयुष्मानचा 'थामा' चित्रपट 21 ऑक्टोबर 2025 ला आज रिलीज झाला आहे. 'थामा' चित्रपटात रश्मिका-आयुष्मानसोबतच सप्तमी गौड़ा, वरुण धवन, नवाजुद्दीन सिद्दीकी, संजय दत्त, परेश रावल, अपारशक्ती खुराणा असे तगडे कलाकार पाहायला मिळत आहेत.'थामा' चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार आहेत. 'थामा' ही एक प्रेमकथा आहे.

Bigg Boss 19 Update
Sachin Pilgaonkar : महागुरू सचिनचा नवा दावा, माझं गाणं 'त्यांनी' ऐकलं अन् अखेरचा श्वास घेतला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com